Vidhan sabha 2019 : कोथरुडमधून चंद्रकांत पाटील तर कसब्यातून मुक्ता टिळक यांचे नाव निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 12:27 AM2019-09-30T00:27:12+5:302019-09-30T00:27:34+5:30

पुणे शहरातील भाजपाच्या दृष्टीने सर्वात सुरक्षित मतदारसंघ समजल्या जाणाऱ्या कोथरुड विधानसभा मतदारसंघातून भाजपा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उतरविण्याच्या तयारी

Maharashtra Vidhan sabha 2019:Chandrakant Patil from Kothrud, Mukta Tilak name confirmed from Kasaba | Vidhan sabha 2019 : कोथरुडमधून चंद्रकांत पाटील तर कसब्यातून मुक्ता टिळक यांचे नाव निश्चित

Vidhan sabha 2019 : कोथरुडमधून चंद्रकांत पाटील तर कसब्यातून मुक्ता टिळक यांचे नाव निश्चित

Next

पुणे : पुणे शहरातील भाजपाच्या दृष्टीने सर्वात सुरक्षित मतदारसंघ समजल्या जाणाऱ्या कोथरुड विधानसभा मतदारसंघातून भाजपा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उतरविण्याच्या तयारी असून कसबा विधानसभा मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे़ शिवाजीनगर मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात येणार असल्याचे सांगितले जात असतानाच तेथून नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आल्याचे समजते.

भाजपाच्या संसदीय समितीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सध्या नवी दिल्लीत सुरु आहे. तेथे महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे निश्चित करण्याचे काम सुरु आहे.  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा लढवावी, अशी इच्छा भाजपाच्या नेत्यांची होती़ पण, कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे प्राबल्य असल्याने तेथे त्यांच्यासाठी कोणताही मतदारसंघ सुरक्षित वाटत नव्हता़ त्यामुळे कोथरुडमधून त्यांचे नाव निश्चित केल्याचे सांगण्यात येत आहे.  कोथरुडमधून २०१४ मध्ये प्रा. मेधा कुलकर्णी यांनी शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे यांच्याविरुद्ध ६४ हजार मतांनी विजय मिळविला होता. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडे या मतदारसंघात उमेदवारच नाही. 

आघाडीमध्ये त्यांनी हा मतदारसंघ मित्र पक्षांसाठी सोडला आहे. त्यामुळे अन्य मतदारसंघापेक्षा युतीसाठी कोथरुड सर्वात सुरक्षित समजला जाऊ लागला आहे.  त्यामुळेच तेथून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव निश्चित
केले जात आहे.  गिरीश बापट यांनी सातत्याने राखलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. कसबा हा भाजपाचा बालेकिल्ला आहे़ गेली अडीच वर्षे मुक्ता टिळक यांनी पुण्याचे महापौर पद सांभाळताना स्वच्छ प्रतिमा जपली आहे. बापट हे खासदार झाल्याने गेल्या २० वर्षांनंतर प्रथमच कसबा मध्ये तिकीटासाठी भाजपामध्ये
रस्सीखेच सुरु झाली होती.  हेमंत रासने, गणेश बीडकर, धीरज घाटे यांनीही उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. पण सर्वसामान्यांना भावणारा चेहरा व महिला त्याचबरोबर गेल्या अडीच वर्षातील काम यामुळे मुक्ता टिळक यांचे पारडे जड ठरले. 

भाजपाच्या आठ ही विधानसभा मतदारसंघापैकी शिवाजीनगर मतदारसंघात अधिक तिढा होता. या जागेची मागणी शिवसेनेने केली होती. त्याचवेळी विद्यमान आमदार विजय काळे यांच्याविषयी पक्षांतर्गत विरोधही जाहीरपणे उफाळून आला होता. लोकसभा निवडणुकीच्या वेळी गिरीश बापट यांना तिकीट देताना अनिल शिरोळे यांना तिकीट न देता विधानसभेला त्यांचे पुत्र सिद्धार्थ शिरोळे यांना तिकीट देण्याचे ठरले असल्याची चर्चा होती. सिद्धार्थ शिरोळे यांनी त्यादृष्टीने गेल्या काही महिन्यांपासून तयारीही सुरु केल्याचे मतदारसंघात दिसून येत होते.  दिल्लीच्या बैठकीत सिद्धार्थ शिरोळे यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे़ २०१४ मध्ये या मतदारसंघात विजय काळे यांनी २२ हजार मतांनी विजय मिळविला होता.  लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांना २५ हजारांहून अधिक मतांची आघाडी येथून मिळाली होती.  

कोथरुड, कसबा आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात युतीचे नेहमीच प्राबल्य राहिले आहे. लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांना कोथरुडमधून सर्वाधिक ९७ हजार ४१० मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे या मतदारसंघातून पालकमंत्री चंद्रकांत पाटील
यांचे नाव निश्चित केले गेले आहे.  कसबा विधानसभा मतदारसंघातून ५० हजार मतांनी आघाडी बापट यांनी घेतली होती तर शिवाजीनगरमध्ये २५ हजार मतांची आघाडी बापट यांना मिळाली होती. 

Web Title: Maharashtra Vidhan sabha 2019:Chandrakant Patil from Kothrud, Mukta Tilak name confirmed from Kasaba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.