शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra: उन्हाचा कडाका वाढणार, विदर्भात पावसाचा अंदाज!

By श्रीकिशन काळे | Updated: March 21, 2024 17:43 IST

पुढील दोन दिवसांत किमान व कमाल तापमानात १ ते २ डिग्री सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे....

पुणे : पुण्यातील कमाल तापमानात वाढ होत असून, दुपारी उन्हाचा चटका चांगलाच जाणवत आहे. तसेच राज्यातील मराठवाडा आणि विदर्भामधील अनेक ठिकाणी किमान व कमाल तापमानात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. विदर्भात पावसाचा अंदाज असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. पुढील दोन दिवसांत किमान व कमाल तापमानात १ ते २ डिग्री सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

आज राज्यामध्ये ढगाळ हवामान असून, तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटका, उकाडा जाणवत आहे. काही दिवस पावसाने हजेरी लावल्यामुळे विदर्भ, मराठवाड्यात सकाळी गारवा जाणवत होता. पुणे शहरातही सकाळी व रात्री गारवा होता. पण आता पुण्यातही उष्णता वाढू लागली आहे.  राज्यामधील अनेक ठिकाणी कमाल तापमान ३७-३८ अंश सेल्सिअसवर पोचले आहे. विदर्भात बुधवारी वाशिमल ३८ तर सोलापूर ३९ अंश सेल्सिवर पोचले होते.

दरम्यान, पश्चिम विदर्भ आणि परिसरावरील चक्राकार वाऱ्यांची स्थिती उत्तर तेलंगणावर सक्रिय आहे. या चक्राकार वाऱ्यांपासून दक्षिण केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. मध्य प्रदेशापासून दक्षिण आसामपर्यंत हवेचा कमी दाब पट्टा कायम आहे.

उष्णतेमध्ये वाढपुणे शहरात आज शिवाजीनगरचे कमाल तापमान ३५.८ नोंदवले गेले असून, किमान तापमान १४.२ नोंदले आहे. सकाळपासूनच उष्णतेचा चटका पुणेकरांना जाणवू लागला आहे. हवेली, एनडीए याभागात मात्र किमान तापमान १३.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्यामुळे सकाळी या ठिकाणी गारवा जाणवत आहे. दुसरीकडे वडगावशेरी, मगरपट्टा, हडपसर, कोरेगाव पार्कचे किमान तापमान २० व २४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले जात आहे.

टॅग्स :Vidarbhaविदर्भMarathwadaमराठवाडाMaharashtraमहाराष्ट्रRainपाऊस