शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
2
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
3
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
4
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
5
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
6
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
7
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
8
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
9
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
10
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
11
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
12
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
13
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
14
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
15
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
16
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
17
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
18
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
19
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
20
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी

मी राष्ट्रवादी पक्ष सोडणार नाही- छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2018 7:04 PM

न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास आहे, न्यायदेवतेमुळे मी आज बाहेर येऊ शकलो आणि पुढे मी निर्दोष सिद्ध होऊन बाहेर पडेल.

पुणे- न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास आहे, न्यायदेवतेमुळे मी आज बाहेर येऊ शकलो आणि पुढे मी निर्दोष सिद्ध होऊन बाहेर पडेल. अनेकांनी मी बाहेर यावं म्हणून प्रयत्न केले, असं म्हणत छगन भुजबळांनी अनेक राजकीय नेत्यांचे आभार मानले. मी पक्षांतर करणार अशा चर्चा होत होत्या. त्यावर आज मी खुलेपणाने बोलणार, कारण हा राष्ट्रवादीचा मंच आहे. आज मी माझी भूमिका स्पष्ट करेन, असंही भुजबळ म्हणाले आहेत. महाराष्ट्र सदन सुंदर, छगन भुजबळ अंदर, अशा भावनाही भुजबळांनी व्यक्त केल्या. मी राष्ट्रवादी पक्ष सोडणार नाही, अशी भूमिकाही भुजबळांनी व्यक्त केली आहे. 

मी जेलमध्ये असताना आठवड्यातून तीनदा माझ्या घरचे साहेबांच्या घरी जायचे. ठोकर लागल्यानंतर येते ती कामयाबी, बचेंगे तो और भी लढेंगे, हम बचेंगे भी और लढेंगे भी, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. सर्व पक्ष, जाती-धर्मांना सोबत घेऊन गेलं पाहिजे. 17 टक्के आरक्षण उरलंय आणि 400 जाती आहेत, कसं द्यायचं आरक्षण?, मराठा समाजाने समजून घ्यावं, तो मोठा भाऊ आहे, मराठा आरक्षणाला माझा पूर्ण पाठिंबा आहे, कुणीही सांगावं मी विरोध केला. 

इंदिराजींची आणीबाणी घटनेवर आधारित होती, आताची आणीबाणी मात्र भीषण आहे. आपण आत्मसंतुष्ट नाही, चार वर्षात त्यांनी खूप दिलं. शेतकऱ्यावर कमी भावासाठी जबरदस्ती, शेतकरी रडताएत, पाकिस्तानकडून आयात केलेली साखर आता यांना गोड लागते. आत्महत्या आता गावात नव्हे, तर मंत्रालयासमोर होतात, केवढे चांगले दिवस आलेत. शेतकरी आत्महत्या करत नाही, हमीभाव मिळतोय, चार किमी गंगा दाखवा जी तुम्ही स्वच्छ केली, असंही भुजबळ म्हणाले. त्यांनी खूप कामे केली, असे ते सांगतीलसुद्धा, देशात चार स्मार्ट सिटी दाखवा, चार जिल्हे दाखवा जे पूर्ण प्रकाशमान आहेत, ज्यांच्यातील जनधन खाती जिवंत आहेत. स्टार्टअप इंडिया, मेकअप इंडियानंतर रुईनअप इंडिया येतंय असं वाटत आहे. गेल्या चार वर्षात देशात एकही अत्याचार झाला नाही, सर्वत्र शांतता आहे. नोटाबंदीमुळे दहशतवाद संपला असून, सर्वांना नोकरी, घराघरात स्वस्त गॅस दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार, असं म्हणत भुजबळांनी भाजपा सरकारवर उपरोधिक टीका केली आहे. घोड्याला भाव आला, गाड्या सोडून लोकं घोडे घ्यायला लागले, पेट्रोल परवडत नाही, बाहेर आल्यानंतर खायचं काय? पाहिलं तर सर्व कुटुंबाच्या खात्यात 15-15 लाख जमा, असं म्हणत भुजबळांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. मै जिंदगी का साथ निभाता चला गया, ...बरबादीयोंका जश्न मनाता चला गया, जो हो गया उसे भुलाता चला गया, या शायरीतून भुजबळांनी मोदी सरकारचे वाभाडे काढले आहेत.  

म्हणे 100 कोटी रुपयांचा माझा बंगला आहे, सगळं अटॅच केलं, मात्र लोकांचं प्रेम अटॅच नाही करू शकले, म्हैस होती पाच फुटांची गाभण आणि रेडकू निघालं 15 फुटांचं, अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्र सदनाच्या कंत्राटदाराची नेमणूक मी केली नाही, त्यावेळी मंत्रीही नव्हतो. महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाचा कंत्राटदारही छगन भुजबळने नेमला नाही.  वाघ म्हातारा झाला म्हणून गवत खात नाही.  जिथे- जिथे छगन भुजबळ नाव तिथे धाडी टाकल्या.  कुणी वाघ म्हणतंय, कुणी माकड म्हणतंय, बंदर उछला तो छोडेगा नही, असं म्हणत भुजबळांनी विरोधकांना इशारा दिला आहे. हा राष्ट्रवादीचा मंच आहे. त्यामुळे मी मनापासून बोलणार आहे. माझ्यासाठी सर्व पक्षांचे नेते पाठीशी राहिले, सर्वांचेच आभार मानतो, असंही भुजबळ म्हणाले. माझ्या सुटकेसाठी मोर्चे काढण्यात आले, पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे भुजबळांनी मनापासून आभार मानले आहेत.  

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळ