शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

Maharashtra lockdown Pune: जमावबंदी ती सर्वसामान्य नागरिकांसाठी! पुण्यात भाजपकडून सरकारी आदेशाची पायमल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 13:36 IST

भाजप वर्धापनदिनाचा कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह १५ हून अधिक नेत्यांची हजेरी

पुणे : मिनी लॅाकडाउनच्या पहिल्याच दिवशी भाजप शहर कार्यालयात  वर्धापन दिनाच्या निमित्ताने भाजप नेत्यांनी जमावबंदीच्या नियमाला हरताळ फासला. दरम्यान सरकारने फसवणूक केली असुन विकेंड लॅाकडाउन ची चर्चा करुन पूर्ण लॅाकडाउन लावला असा आरोप यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीयांनी केला. 

पुण्यात भाजपच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्षांसह जवळपास १५ नेते आणि कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. पुण्यामध्ये आजपासून मिनी लॉकडाऊनला सुरुवात झाली. या नियमानुसार शहरात सकाळी ७ ते संध्याकाळी ६ दरम्यान शहरात ५ पेक्षा अधिक लोकांना एकत्र यायला परवानगी नाही. तरीदेखिल हे नेते कार्यकर्ते एकत्र आले. अर्थातच कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने करत असल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत. 

या कार्यक्रमाला सध्याची सामाजिक राजकीय परिस्थिती लक्षात घेता थोड्याच लोकांना बोलावले आहे असे चंद्रकांत पाटील म्हणाले. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी जरी निर्बंधांना पाठिंबा दिला असला तरी पाटी यांनी त्याला आक्षेप घेतलाय. ते म्हणाले “ सरकारने फसवणूक केली आहे. त्यांनी फडणवीसाांना सांगितले होते की, विकेंड लॉकडाउन असेल. मात्र हा संपूर्ण लॅाकडाऊन आहे. गोरगरीबांच्या पोटाचे काय? व्यापारी देखील मला फोन करत आहेत. त्यांचा काहीच विचार केला जात नाही. “ 

याचवेळी बोलताना खासदार गिरीश बापट म्हणाले ,” हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होऊशकला असता.पण व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातुन हा कार्यक्रम करत आहोत.” 

दरम्यान शहरातील परिस्थितीची आठवण करुन द्यायला ही नेते मंडळी विसरली नाहीत. कोरोनाच्या परिस्थिती बाबत सांगत शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले ,” आज व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन केले आहे. आपण त्या निमित्ताने लसीकरणालाठी मोहीम सुरु करत आहोत. पण राज्य सरकारचा मोगलाई लादायचा प्रयत्न चालला आहे. पीएमपीएमएल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय आम्ही मान्य करणार नाही. त्याला विरोध करणार. “ 

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले ,” कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही साधेपणाने आज साधेपणाने वर्धापन दिन साजरा करत आहोत. राज्यातील सामाजिक परिस्थिती पाहता त्यामध्ये सामाजिक भान जपलेलं आपल्याला दिसतंय.”

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस