भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 21:11 IST2025-12-21T20:53:31+5:302025-12-21T21:11:55+5:30
Maharashtra Local Body Election Results 2025: पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे विजयी जल्लोषाच्या मिरवणुकीदरम्यान आगीची घटना घडली. जेजुरी गडाच्या कमानीजवळ सुरू असलेल्या भंडाऱ्याच्या उधळणीदरम्यान अचानक मोठा भडका उडाल्याने एकच खळबळ उडाली.

भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे विजयी जल्लोषाच्या मिरवणुकीदरम्यान आगीची घटना घडली. जेजुरी गडाच्या कमानीजवळ सुरू असलेल्या भंडाऱ्याच्या उधळणीदरम्यान अचानक मोठा भडका उडाल्याने एकच खळबळ उडाली.
प्राथमिक माहितीनुसार, कापूर पेटवलेला असतानाच त्यावर भंडारा पडल्याने आगीचा भडका उडाला . या घटनेत विजयी उमेदवार स्वरूपा खोमणे आणि घाडगे हे दोघे गंभीररित्या भाजले असल्याची प्राथमिक माहिती आहे. या दोघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शिवाय आगीत १८ जण भाजले असल्याची प्राथमिक माहिती असून, जखमींमध्ये कार्यकर्ते व नागरिकांचा समावेश आहे. घटनेनंतर काही काळ परिसरात अफरातफर उडाली होती. स्थानिक नागरिक, पोलीस व अग्निशमन दलाने तात्काळ मदतकार्य सुरू करून आग आटोक्यात आणली.