शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पैलवान शिवराज राक्षेंची पंचांना मारहाण, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांची पहिली प्रतिक्रिया… 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 13:13 IST

Maharashtra Kesari 2025 Controversy: शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारण्यावर महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांनी आपलं मत मांडलं

Maharashtra Kesari 2025 Winner: अहिल्यानगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ यांनी किताब पटकावला. मात्र, या स्पर्धेत पंचांच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला. पैलवान महेंद्र गायकवाड यांनी पंचांशी वाद घातला, तर शिवराज राक्षे यांनी थेट पंचांची कॉलर धरून त्यांना लाथ मारली.

या संपूर्ण प्रकारावर आज महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांनी भाष्य केले. आज त्यांनी पुण्यात दगडूशेठ बापाचे दर्शन घेतलं. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्र केसरी स्पर्धा लागलेल्या गालबोटाबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिली. शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारण्यावर महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांनी आपलं मत मांडलं

त्यांनी आपल्या विजयाचा आनंद व्यक्त करताना सांगितले की, “मी मेहनत घेतली, तयारी केली आणि आज अखेर महाराष्ट्र केसरी किताब जिंकण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले.” महाराष्ट्र केसरीची गदा पटकावल्यानंतर त्यांनी तालमीतील लोकांचे आणि पुणे जिल्ह्यातील सर्वांचे आभार मानले.

वादग्रस्त निकालावर पृथ्वीराज मोहोळ यांची प्रतिक्रिया

मोहोळ यांनी स्पष्ट केले की, “मी पंचांच्या निर्णयावर काही बोलणार नाही. निकाल सर्वांनी पाहिला आहे. मागील वर्षी माझ्यावर अन्याय झाला, पण मी संयम ठेवला आणि मेहनतीच्या जोरावर यंदा विजय मिळवला. पराजय स्वीकारण्याची ताकद हवी.”

शिवराज राक्षे यांनी पंचांना मारहाण केल्याच्या घटनेबाबत बोलताना मोहोळ म्हणाले, “मी खेळाडू आहे, राजकारणात मला रस नाही. पंचांचा निर्णय अंतिम असतो. मागील वेळी माझ्याबाबतीत असेच घडले, पण मी संयम ठेवला. पराजय स्वीकारला आणि तयारी करत पुन्हा विजय मिळवला. आता याही वेळेस तसेच व्हायला हवे.”

पुढील लक्ष्य: हिंद केसरी आणि भारत केसरी

पृथ्वीराज मोहोळ यांनी सांगितले की, “माझे पुढचे ध्येय हिंद केसरी आणि भारत केसरी बनण्याचे आहे. आता मी थेट घरी आईला भेटायला जाणार आहे. त्यानंतर पुढील तयारी सुरू करणार आहे.”

यावेळी पंचांच्या निर्णयावर राजकीय हस्तक्षेप होत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, याबाबत विचारले असता मोहोळ म्हणाले, “राजकारणाचा मला काही संबंध नाही. मी फक्त मेहनत करून माझे लक्ष्य गाठत राहणार आहे.”

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाAhilyanagarअहिल्यानगर