शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

उजाड माळरानावर फुलली शिक्षणाची बाग, महाराष्ट्र सरकारकडून विठ्ठलवाडीच्या शाळेची यशोगाथा चित्रित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 01:08 IST

देऊळगावगाडा (ता. दौंड) केंद्रातील विठ्ठलवाडी प्राथमिक शाळेने आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या सहकाऱ्याच्या माध्यमातून येथील उजाड माळरानावर शिक्षणाची बाग फुलविली आहे.

खोर - देऊळगावगाडा (ता. दौंड) केंद्रातील विठ्ठलवाडी प्राथमिक शाळेने आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या सहकाऱ्याच्या माध्यमातून येथील उजाड माळरानावर शिक्षणाची बाग फुलविली आहे. या शाळेची दखल महाराष्ट्र सरकारने घतली असून, माहिती व जनसंपर्क मंत्रालयाने शाळेची यशोगाथा याच शाळेतील उपक्रमशील शिक्षक युवराज घोगरे यांच्या आवाजात चित्रित करून ती प्रसारित केली आहे.या शाळेने आत्तापर्यंत अनेक वेळा आपल्या यशाचा ठसा उमटवला आहे. शाळेने तयार केलेला स्वच्छ भारत अभियानाचा लोगो संसदेमधील प्रदर्शनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोमध्ये प्रदर्शित झाला होता. शाळेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले होते. केंद्र सरकारच्या ब्लॉगवर, महाराष्ट्र सरकारच्या पोर्टलवर शाळेचा लेख, व्हिडीओ, फोटो झळकले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये शाळेतील युवराज घोगरे या शिक्षकाला सहभागी होण्याची संधी मिळाली होती. २०१७-१८ या वर्षात पुणे जिल्ह्यातील विविध स्पर्धांमध्ये सर्वांत जास्त १७ बक्षिसे या शाळेला मिळाली आहेत. या शाळेचे वैविध्यपूर्ण व नावीन्यपूर्ण उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्रभर पाहिले जातात.ग्रामस्थांनी एकत्र येऊन अनेक भौतिक सुविधा शाळेत निर्माण केल्या आहेत. ही शाळा गेली अनेक वर्षे एक तास अगोदरच भरते. गावातील गावकरी नेहमी शिक्षकाच्या कार्यास आपल्या सहकार्याने प्रेरणा देतात. या गावाच्या सरपंच पूनम विधाटे, माजी सरपंच डी. डी. बारवकर, ग्रामपंचायत सदस्य केशव बारवकर, अजय गवळी , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुमंत बारवकर, मुख्याध्यापक संदीप ढगे तसेच गावातील सर्व ग्रामस्थ शाळेच्या प्रगतीसाठी नेहमी तत्पर असतात. या शाळेचे सध्या नूतनीकरणाचे काम चालू असून, दौंड तालुक्यातील प्रथम क्रमांकाची शाळा म्हणून विठ्ठलवाडी प्राथमिक शाळेकडे पाहिले जाते. येथील शाळेचा कला मंच व शाळेचे प्रवेशद्वार येणाºया-जाणाºयाचे मन अगदी प्रसन्न करीत आहे.शाळेचा विकास हाच शिक्षकाचा ध्यास...या शाळेतील युवराज घोगरे हे शिक्षक नेहमी शाळेच्या प्रगतीसाठी नवनवीन कल्पना साकारत असतात. ‘एकच ध्यास-शाळेचा विकास’ हे ध्येय त्यांची गावकºयांसमोर ठेवले व आकारास आणले.सानेगुरुजी व महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समोर ठेवून ते नेहमी आपला सर्व वेळ शाळेसाठी देतात. मुख्याध्यापक संदीप ढगे हे या शिक्षकाला नेहमी मोलाची साथ देतात.

टॅग्स :SchoolशाळाPuneपुणेEducation Sectorशिक्षण क्षेत्र