शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
3
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
5
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
6
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
7
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
8
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
9
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
10
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
11
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
12
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
13
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
14
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
16
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
17
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
18
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
19
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
20
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं

महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : शिवाजीनगर मतदारसंघातील निर्णायक लढतीत सिध्दार्थ शिरोळेंचा विजय  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 21:26 IST

Pune Election 2019 : ''वंचित '' फॅक्टरमुळे राहिले बहिरट'' विजया'' पासून वंचित

ठळक मुद्दे१९ व्या व २० व्या फेरीत अपेक्षेप्रमाणे भाजपाला एकूण मतांपैकी ७० ते ७५ टक्के मते टपाल मतदानात दत्ता बहिरट यांना १६३ तर सिद्धार्थ शिरोळै यांना १३६ मते

पुणे : शेवटच्या फेरीपर्यंत अटीतटीने रंगलेल्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनी काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांच्यावर विजय मिळविला़. शेवटच्या फेरीत शिरोळे यांचा विजय साकारला़. भाजपाचे सिद्धार्थ शिरोळे यांना ५८ हजार ७२७ मते मिळाली तर, काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांना ५३ हजार ६०३ मते मिळाली़ सिद्धार्थ शिरोळे यांचा ५ हजार १२४ मतांनी विजय झाला़ .मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या तीन फेरीमध्ये दत्ता बहिरट यांनी मामुली ५४२ मतांची आघाडी घेतली. होती़. यावेळी वंचितचे अनिल कुºहाडे यांना १२३१ मते मिळाली होती़. चौथ्या फेरीत खडकी, बोपोडी भागात सिद्धार्थ शिरोळे यांना २०७८ मते मिळाली़. तर दत्ता बहिरट यांना १४८५ मते मिळाली़ त्याचवेळी वंचितचे अनिल कुºहाडे यांना १२१३ मते मिळाले़ त्यामुळे शिरोळे यांनी बहिरट यांची आघाडी कमी करण्यास सुरुवात केली़. औंध गावात ५ व्या फेरीत अखेर शिरोळे यांनी २ हजार ४९० मतांची आघाडी घेतली होती़. ६ व्या फेरीत दोघांनाही जवळपास सारखी मते मिळाली़ ७ व्या फेरीत शिरोळे यांची आघाडी वाढली़. पुढच्या ८ व ९ व्या फेरीत घेतली. त्यानंतर १३ व्या फेरीत शिवाजीनगर गावठण भागात दत्ता बहिरट यांनी पुन्हा एकदा अधिक मते मिळवत धक्का देत शिरोळे यांची आघाडी कमी केली़. पुढच्या १४ व्या फेरीत पुन्हा शिरोळे यांना मॉडेल कॉलनी या पारंपारिक भागात ११५० मतांची आघाडी मिळाली़ व त्यांनी आपले लीड ५ हजार ७४४ मतांपर्यंत वाढविले़.१८ व्या फेरीत दत्ता बहिरट यांनी पुन्हा आघाडी घेत शिरोळे यांना मागे टाकले़. १८ व्या फेरीअखेर दत्ता बहिरट यांना १७३ मतांची आघाडी होती़. मात्र, पुढील दोन फेºया या भाजपाचा हार्डकोर मतदार असलेल्या आपटे रोड, भांडारकर रोड, प्रभात रोडवरील मतमोजणी बाकी असल्याने व तेथे नक्कीच आघाडी मिळण्याची निश्चिती असल्याने मतमोजणीच्या ठिकाणी असलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी नि: श्वास सोडला तर, दुसरीकडे कॉंग्रेस कार्यकर्ते निराश झाले़.१९ व्या व २० व्या फेरीत अपेक्षेप्रमाणे भाजपाला एकूण मतांपैकी ७० ते ७५ टक्के मते मिळाल्याने शिरोळे यांचा ५ हजार १२४ मतांनी विजय साकारला़.  टपाल मतदानात दत्ता बहिरट यांना १६३ तर सिद्धार्थ शिरोळै यांना १३६ मते मिळाली़ .

..........

गोखलेनगर, दीपबंगला, पांडवनगर या भागातील १५, १६, १७ व्या फेरीत दत्ता बहिरट यांनी आघाडी घेत शिरोळे यांना जोरदार धक्का दिला़ १७ व्या फेरी अखेर शिरोळे यांच्याकडे केवळ १७९ मतांची आघाडी राहिली होती़. या भागात दत्ता बहिरट यांना मोठी आघाडी अपेक्षित होती़. या फेरीत प्रामुख्याने वडारवाडी, हेल्थ कॅम्प भागातील मतदान होते़ त्याच ठिकाणी वंचितचे अनिल कुऱ्हाडे यांना चांगलीच मते मिळाली़ १६ व्या फेरीत शिरोळे यांना २४९४ तर कुºहाडे यांना ११७ मते, १७ व्या फेरीत शिरोळे यांना केवळ १७८८ मते मिळाली त्याचवेळी कुऱ्हाडे यांना १७६४ मते होते़ यामुळे दत्ता बहिरट यांना या फेरीत आघाडी मिळाली तरी ते अपेक्षित आघाडी मिळू शकली नाही़.

...........

भाजपाचा बालेकिल्ला असतानाही कॉंग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांनी दिलेल्या जोरदार लढतीमुळे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील चुरस अखेरच्या फेरीपर्यंत रंगत गेली़.कुऱ्हाडे  मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर गावठाण या भागाने काँग्रेसच्या पारड्यात आपले मत टाकले असताना भाजपाची शेवटची आशा असलेल्या भांडारकर रोड, प्रभात रोड या भागाने शेवटच्या २० व्या फेरीत तब्बल ७५ टक्के मते दिल्याने सिद्धार्थ शिरोळे यांचा विजय सुकर होऊ शकला़. वंचित बहुजन आघाडीचे अनिल कुºहाडे यांनी काँग्रेसला आघाडी मिळालेल्या बोपोडी, वडारवाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर मते खेचल्याने दत्ता बहिरट यांच्या हातातोंडाशी आलेला विजय निसटला़.

टॅग्स :Puneपुणेshivajinagar-acशिवाजीनगरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019VotingमतदानBJPभाजपा