शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोट प्रकरणः प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
2
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
3
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
अमेरिकेचा भारतावर 'टॅरिफ बॉम्ब'! आता iPhone महागणार, 'मेक इन इंडिया'ला मोठा धक्का!
5
'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी बुडवणार...', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले
6
२ ऑगस्टला जग अंधारात बुडणार नाही; दा. कृ. सोमण यांचे स्पष्टीकरण
7
ट्रम्प यांच्या २५% टॅरिफच्या घोषणेनंतर भारतातील 'हे' शेअर्स जोरदार आपटले; विकण्यासाठी रांग, तुमच्याकडे आहेत?
8
ठाण्यात राजकीय वातावरण तापले; राजन विचारे यांच्या बॅनरवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जुंपली
9
अहो आश्चर्यम! गर्भाशयात नाही, लिव्हरमध्ये वाढतंय बाळ; काय आहे इंट्राहेपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी?
10
कौतुक करता-करता कर लादला; ट्रम्प यांच्या 25% टॅरिफवरुन विरोधकांचा मोदी सरकारवार निशाणा
11
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
12
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
13
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
14
मेघा धाडेनं सांगितलं दुसरं लग्न करण्यामागचं कारण, म्हणाली - "त्या दिवशी मला..."
15
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
16
Hit and run: २१ वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं अन् पळून गेली; कोण आहे नंदिनी कश्यप?
17
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
18
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
19
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट
20
नववधूने 'ती' मागणी पूर्ण केली नाही; संतापलेल्या पतीने केलं असं काही की ऐकून येईल राग!

Maharashtra Election 2019 : स्वार्थी राजकारणाने केला हडपसरच्या वाहतुकीचा खेळखंडोबा : योगेश टिळेकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 13:12 IST

हडपसरला भेडसावत असलेल्या वाहतूककोंडी निर्माण करणारे काँग्रेस व राष्ट्रवादी आहे ..

हडपसर : पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी दोन मोठ्या टाऊनशिप आणल्या. पण त्यामानाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम केली नाही. भविष्यातील निर्माण होणाऱ्या  समस्यांचा विचार केला गेला नाही. काँग्रेस राष्ट्रवादीने हडपसरकरांवर नित्याची  वाहतूककोंडी  लादली असल्याचा  आरोप महायुतीचे उमेदवार योगेश टिळेकर यांनी केला आहे.  महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांनी साडेसतरानळी  परिसरात आज पदयात्रा काढण्यात आली. या वेळी  मतदारांशी टिळेकर यांनी संवाद साधला. या वेळी पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व नागरिक पदयात्रेत सहभागी झाले होते. हडपसरला भेडसावत असलेल्या वाहतूककोंडी निर्माण करणारे काँग्रेस व राष्ट्रवादी आहे. लोकसंख्या वाढली परंतु त्यांना सुविधा मिळाल्या नाहीत.  त्यांच्या या कामामुळेच या परिसरात वाहतूककोंडी सततची असते. त्यांच्यावर प्रभावी उपाय म्हणून कोरेगाव पार्कपासून मांजरी गावठाण पर्यंत रस्ता चौपदरीकरण केला.  दोन मोठ्या अंडरपास प्रस्तावित केल्या आहेत. दोन मोठ्या टाऊनशिपमधील रस्ता रुंदीकरण कोणामुळे रखडला याचा जाब नागरिकांनी यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांना विचारावा. असे सांगून टिळेकर म्हणाले की,  लवकरच हा रस्ता वाढून उड्डाणपुलासाठी सर्व्हे करण्यात येईल व अंडरपास निर्माण केला जाणार आहे. हडपसरला मेट्रो आणणार आहे. वाडगाव कात्रज कोंढवा उंड्री वडकी थेऊर लोणीकंद  ४२ किलो मीटरचा ५८८ हा नवीन राष्ट्रीय महामार्ग  होत आहे. कात्रज कोंढवा रस्त्यामुळे येथील वाहतूक कोंडी सुटणार आहे. कात्रजच्या वाहतूककोंडीवर उपाय म्हणून सहा पदरी उड्डाणपूल होणार आहे. ससाणेनगर सय्यदनगर रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्ग, मुंढवा, घोरपडी, मांजरी येथील उड्डाणपुलामुळे वाहतुकीची समस्या सुटेल, असे  वाहतुकीविषयी नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नाला  टिळेकर यांनी उत्तर दिले.

टॅग्स :HadapsarहडपसरBJPभाजपाhadapsar-acहडपसरElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस