शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा चंद्रकांत पाटलांना पाठिंबा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 18:51 IST

उमेदवारी जाहीर झाल्यापासून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना अनेक कारणांनी विरोध होत आहे...

ठळक मुद्देराज्यात लक्षवेधी असलेली पुण्यातील कोथरूड विधानसभा लढत

पुणे : कोथरूड मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाल्यापासून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना अनेक मुद्दे उपस्थित करून विरोध होत आहे. कधी त्यांना स्थानिक उमेदवार नसल्याचे कारण देत लक्ष्य केले गेले तर कधी जातीयतेचा मुद्दा उपस्थित ब्राहमण महासंघाने त्यांना विरोध दर्शवला. दुसरीकडे काँग्रेस- राष्ट्रवादीसह विरोधकांनी मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा देत '' दादां ''ना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, अखिल भारतीय महासंघाने चंद्रकांत पाटलांना पाठिंबा जाहीर केला असल्याची घोषणा एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. 

संपूर्ण राज्यात लक्षवेधी असलेल्या पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विरुद्ध मनसेचे किशोर शिंदे असा रंगतदार सामना रंगणार आहे . त्यापार्श्वभूमीवर ब्राम्हण महासंघाचे पदाधिकारी आणि चंद्रकांत पाटील यांच्यात बैठक पार पडली.  त्यात ब्राह्मण समाजाच्या समस्या आणि मागण्या यासंदर्भात चर्चा झाल्यानंतर महासंघाने एका पत्रकाद्वारे दादांच्या पाठिंब्याची घोषणा केली. मात्र त्यामुळे ब्राह्मण समाजाच्या मतात विभागणी होण्याची शक्यता होती. यावेळी ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, प्रदेश अध्यक्ष मोहिनी पत्की, पुणे जिल्हाध्यक्ष आनंद दवे उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कि, ब्राम्हण महासंघाचा माझ्या उमेदवारीला विरोध नाही, तर त्यांच्या काही मागण्या आहेत, ज्या सरकारने अद्याप पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा रोष सरकारवर आहे. पण सध्या आचारसंहिता असल्यामुळे त्यांच्या मागण्यांवर निर्णय होत नाही. आचारसंहिता समाप्त होताच आम्ही त्यांच्या मागण्यांचा नक्कीच विचार करू. त्यामुळे ब्राह्मण महासंघाचा उमेदवार माघार घेईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :Puneपुणेkothrudकोथरूडbrahman mahasanghब्राह्मण महासंघElectionनिवडणूकBJPभाजपाShiv Senaशिवसेना