Maharashtra Election 2019 : हडपसर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार टिळेकरांच्या प्रचारात उतरले सनी देओल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 12:56 PM2019-10-16T12:56:51+5:302019-10-16T12:57:19+5:30

भारी संख्या में जो भी योगेश अण्णा के कार्यकर्ता देख रहा हूँ। उस्मे मुझे मेरा एक डायलॉग याद आया है...

Maharashtra Election 2019 : Sunny Deol in Tilekar promotion campaign in hadapsar | Maharashtra Election 2019 : हडपसर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार टिळेकरांच्या प्रचारात उतरले सनी देओल

Maharashtra Election 2019 : हडपसर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार टिळेकरांच्या प्रचारात उतरले सनी देओल

googlenewsNext
ठळक मुद्देदुचाकी रॅली : केशवनगर, मुंढवा, मांजरी परिसरात प्रचार

हडपसर : भारी संख्या में जो भी योगेश अण्णा के कार्यकर्ता देख रहा हूँ। उस्मे मुझे मेरा एक डायलॉग याद आया है ।, योगेश टिळेकर जिंदाबाद था, जिंदाबाद है  और जिंदाबाद रहेगा। असे गौरवोद्गार अभिनेते खासदार सनी देओल यांनी काढले.
महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांच्या प्रचारार्थ प्रसिद्ध अभिनेता खासदार सनी देओल यांच्यासह  भव्य बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती. लोणकर विद्यालय मुंढवा येथून सुरू होऊन पुढे  केशवनगर, मांजरी परिसरात रॅलीचे विराट रॅलीत रूपांतर झाले. पुढे १५ नंबर गाडीतळ, सातववाडी काळेपडल, ससाणेनगर, हडपसरगाव, पुणे सोलापूर रोड,  शंकरमठ येथे येऊन रॅलीची सांगता रामटेकडी येथे झाली.
दरम्यान साडेसतरानळी येथे शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या समवेत पदयात्रा झाली. या वेळी नगरसेवक  मारुती तुपे, प्रमोद भानगिरे, विकास रासकर, भूषण तुपे, रवी तुपे, डॉ.बहिरट, विराज तुपे, सत्यजित तुपे, राहुल शिंदे, दिलीप तुपे, सुनील धुमाळ, महेंद्र बनकर, समीर तुपे, वीरभद्र गाभणे, विजय देशमुख, संगीता ठोसर, आदी उपस्थित होते.

विकास कामावर विश्वास 
आज खासदार अभिनेते सनी देओल आमच्या आग्रहाखातर रॅलीत उपस्थित आहेत. हडपसरमध्ये जनतेला मी केलेल्या विकासकामावर विश्वास असल्याकारणाने प्रत्येक ठिकाणी आजच्यासारखा मोठा प्रतिसाद पदयात्रा व रॅलीला  मिळत आहे. महायुतीचा उमेदवार म्हणून मी त्या विश्वासाला नक्कीच येथून पुढेही पात्र होईल. येणाऱ्या२१ तारखेला हीच सर्व हडपसरची जनता मोठ्या मताधिक्याने मला पुन्हा सेवा करण्याची संधी देईल, असा विश्वास योगेश टिळेकर यांनी व्यक्त केला. 

Web Title: Maharashtra Election 2019 : Sunny Deol in Tilekar promotion campaign in hadapsar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.