Maharashtra Election 2019 : गरिबांना त्रास देणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा : जगदीश मुळीक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 12:48 PM2019-10-12T12:48:31+5:302019-10-12T12:49:02+5:30

दादागिरी आणि दहशत विरोधकांचे कार्यकर्ते करत आहे.

Maharashtra Election 2019 : Show their place to those who are hurting the poor: jagdish mulik | Maharashtra Election 2019 : गरिबांना त्रास देणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा : जगदीश मुळीक

Maharashtra Election 2019 : गरिबांना त्रास देणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा : जगदीश मुळीक

Next

वडगाव शेरी : लोहगावमध्ये नवीन घर बांधण्याचे साहित्य आणि ठेका आम्हालाच दिला पाहिजे. गरिबांचे बांधकाम सुरू केल्यावर त्यांना नाहक त्रास देणे. बांधकामासाठी पैसे मागणे, अशा प्रकारची दादागिरी आणि दहशत विरोधकांचे कार्यकर्ते करत आहे. या दादागिरी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन भाजप महायुतीचे उमेदवार जगदीश मुळीक यांनी नागरिकांना केले.
वडगाव शेरी मतदार संघातील भाजप, शिवसेना, रिपाइं, रासप आणि शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार  आमदार जगदीश मुळीक यांची प्रचार फेरी आज वडगाव शेरी, साईनाथनगर, राघोबा पाटीलनगर, वृंदावननगर आणि गलांडेवस्ती या  ठिकाणी झाली. यावेळी आमदार मुळीक बोलत होते. 
यावेळी नगरसेवक योगेश मुळीक, नगरसेविका सुनीता गलांडे, नगरसेवक संदीप जºहाड, नगरसेविका शीतल शिंदे, साधना भगत, सुधीर गलांडे तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते. 
याप्रसंगी मुळीक म्हणाले की, गरिबांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देऊन पैसे कमवण्याचे गोरख धंदा लोहगाव आणि परिसरामध्ये सुरू आहे. एखाद्या गरिबांना घराचे बांधकाम काढल्यानंतर कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहचतात. पालिकेच्या नियमात कसे बांधकाम बसत नाही. आम्ही कार्यकर्ते आहोत. आमचं काही तरी केल पाहिजे, असे सांगून नागरिकांकडून पैसे उकळण्याचे प्रकार करत आहे, अशा लोकांना त्यांची जागा दाखवण्याची गरज आहे. गेल्या पाच वर्षामध्ये वडगावशेरी मतदार संघामध्ये चंदननगर, विमाननगर, नगररोड, विमानतळ या ठिकाणी पोलीस स्टेशनचे काम केले आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास आले आहे. लोहगाव, वडगाव शिंदे, निरगुडी आणि मांजरी या ठिकाणी अकरा कोटींची कामे केली आहेत.

Web Title: Maharashtra Election 2019 : Show their place to those who are hurting the poor: jagdish mulik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.