शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

Maharashtra Election 2019 : पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘प्रचार की बात’ १७ ऑक्टोबरला पुण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 12:34 IST

Pune Vidhan Sabha Election 2019 : शहरातील सर्वच मतदारसंघांना सोयीचे होईल, असे ठिकाण त्यासाठी निश्चित करण्यात येत आहे.

ठळक मुद्देस्थळ अद्याप निश्चित नाही : भाजपची बूथ यंत्रणा झाली कार्यान्वित शहरातील शैक्षणिक संस्थांनी त्यांची मैदाने प्रचारासाठी उपलब्ध करून देणे केले बंद

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील प्रचारसभेसाठी शहर भाजपाला १७ ऑक्टोबर (गुरुवार) ही तारीख मिळाली आहे. संपूर्ण पुणे शहरासाठी ते एकच सभा घेणार आहेत. यासाठी सोयीचे स्थळ निश्चित करण्यात येत आहे. दरम्यान, भाजपची संघटनात्मक स्तरावर असलेली बूथ यंत्रणा कार्यान्वित झाली असून ‘घरोघरी संपर्क’ हे सूत्र त्यांना दिले आहे.शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांनी सांगितले, की पक्षाच्या केंद्रीय शाखेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ ऑक्टोबरला सभेसाठी येतील, असे कळवले आहे. ते सातारा येथेही त्याच दिवशी सभा घेणार आहेत. त्यामुळे वेळ अद्याप निश्चित झालेली नाही. पुण्यात त्यांची एकच सभा होणार आहे. शहरातील सर्वच मतदारसंघांना सोयीचे होईल, असे ठिकाण त्यासाठी निश्चित करण्यात येत आहे. शहरातील शैक्षणिक संस्थांनी त्यांची मैदाने प्रचारासाठी उपलब्ध करून देणे बंद केले आहे. त्यामुळे मोठ्या मैदानांची कमतरता जाणवत आहे; मात्र त्यावर मार्ग काढण्यात येईल. पंतप्रधानांशिवाय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह व अन्य काही मंत्र्यांच्या सभांचीही मागणी शहर शाखेने केंद्राकडे केली आहे. त्यांच्याही सभा प्रचारकाळात होतील, अशी माहिती मिसाळ यांनी दिली.  भाजपची संघटनात्मक रचना प्रचारासाठी कार्यान्वित झाली आहे. बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख तसेच त्यांच्याबरोबर असणारे सदस्य, कार्यकर्ते प्रचारात उतरले आहेत. सर्व विधानसभा मतदारसंघांत ही यंत्रणा काम करत आहे. त्यांच्या बैठका घेऊन त्यांना सूचना दिल्या आहेत. नेहमीप्रमाणे घरोघरी संपर्क व भाजपच्या उमेदवाराचे नाव, पक्षाचे काम, गेल्या ५ वर्षांतील केंद्र तसेच राज्यातील कामगिरी याची मतदारांना थोडक्यात, पण प्रभावी माहिती त्यांच्याकडून देण्यात येत आहे. उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते यांच्याशिवायच्या या यंत्रणेचा भाजपाच्या काही वर्षांतील राजकीय यशात मोठा वाटा आहे. केंद्रीय मंत्र्यांशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यमंत्र्यांच्याही सभा होणार आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या कामगिरीवर भाजपच्या प्रचाराचा भार आहे. त्याशिवाय गेल्या ५ वर्षांत राज्य सरकारने पुण्यासाठी दिलेल्या मेट्रो, स्मार्ट सिटी, नदीसुधार, नदीकाठसंवर्धन, समान पाणीपुरवठा योजनांबाबतही पुणेकर मतदारांना सांगण्यात येईल.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Narendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभाBJPभाजपाpune-cantonment-acपुणे कन्टॉनमेंटAmit Shahअमित शहा