शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

Maharashtra Election 2019: ‘दादा’ मंडळींच्या उमेदवारीमुळे लक्षवेधी लढती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 4:45 AM

एकाच मतदारसंघात दोन-तीन शिलेदार तयार करायचे आणि त्यांना झुंजवत ठेवायचे, ही आजपर्यंतची राष्टÑवादीची रणनीती.

- अविनाश थोरातपुणे जिल्हा एके काळचा राष्टÑवादीचा बालेकिल्ला; पण गेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने तो उद्ध्वस्त केला. राष्टÑवादी कॉँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि कॉँग्रेसबरोबरचा बेबनाव याबरोबरच राष्टÑवादी कॉँग्रेसला अती आत्मविश्वास नडला. परंतु, या वेळी राष्टÑवादी कॉँग्रेसचे तारे जमिनीवर आल्याने जिल्ह्यात चुरस वाढली आहे.

एकाच मतदारसंघात दोन-तीन शिलेदार तयार करायचे आणि त्यांना झुंजवत ठेवायचे, ही आजपर्यंतची राष्टÑवादीची रणनीती. त्यामुळे त्यांना फटका बसला आणि बसतोय. परंतु, या वेळी त्यांनी वास्तवाचे भान ठेवून कॉँग्रेसबरोबरचे संबंध सुधारले. काही ठिकाणी अपक्ष आणि इतर पक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. त्यामुळे चुरस वाढली आहे.

पुरंदरची जागा कॉँगे्रसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांना सोडून संपूर्ण राष्टÑवादी त्यांच्या मागे उभी केल्याने शिवसेनेचे विद्यमान मंत्री विजय शिवतारे यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. मावळमध्ये ऐन वेळी भाजपचे बंडखोर सुनील शेळके यांना उमेदवारी देऊन चुरस निर्माण केली. भोसरीमध्ये विलास लांडे आणि चिंचवडमध्ये अपक्ष लढणारे राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला आहे.

मात्र, शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीनेही संपूर्ण ताकद लावली आहे. गेल्या वेळी वेगवेगळे लढूनही युतीने १६ जागा मिळविल्या होत्या. या वेळी हर्षवर्धन पाटील यांच्यासारखा कॉँग्रेसचा ज्येष्ठ नेता भाजपामध्ये आहे. याशिवाय, राष्टÑवादीतील महत्त्वाच्या कार्यकर्त्यांचे भाजपात प्रवेश झाले आहेत. त्यामुळे युतीची ताकद वाढली आहे. परिणामी, शरद पवार यांच्या जिल्ह्यात राष्टÑवादी कॉँग्रेसपुढे आव्हान उभे आहे.रंगतदार लढतीकोथरूड मतदारसंघात भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि मनसेचे किशोर शिंदे यांच्यात लढत होत आहे. स्थानिक विरुद्ध बाहेरचा, असे स्वरूप या लढतीला आले आहे. कॉँग्रेस आणि राष्टÑवादीने येथे मनसेला पाठिंबा दिला आहे. भाजपानेही आपली सर्व ताकद येथे लावली आहे.इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील भाजपाकडून लढत आहेत. राष्टÑवादीचे दत्तात्रेय भरणे यांच्याशी त्यांची लढत आहे. राष्टÑवादीच्या काही नाराजांनी पाटील यांना पाठिंबा दिला आहे. मात्र, ही लढत अजित पवार विरुद्ध पाटील, अशीच आहे.जुन्नर विधानसभा मतदारसंघात गेल्या वेळी निवडून आलेले मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे शिवसेनेकडून लढत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या आशा बुचके यांनी बंडखोरी केली आहे. राष्टÑवादीकडून अतुल बेनके लढत आहेत. कॉँग्रेसही सोबत आहे. खासदार अमोल कोल्हे यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे.प्रचारातील प्रमुख मुद्दे१) पुण्यातील वाहतूककोंडी, सार्वजनिक वाहतूकव्यवस्था, कचरा२) ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव३) आंतरराष्टÑीय विमानतळ, औद्योगिक वसाहतींमधील गुंडगिरी४) ग्रामीण-शहरी पाण्याचा वाद, शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी- बारामतीमध्ये अजित पवार यांच्याविरोधात गोपीचंद पडळकर यांना उभे करून भाजपाने जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे.- पुणे शहरातील आठही मतदारसंघात शिवसेना-भाजपा विरुद्ध कॉँग्रेस-राष्टÑवादी लढाई आहे. कसबा, हडपसर येथे मनसे कोणाची मते घेणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या वेळी सर्व ठिकाणी भाजपाने विजय मिळविला होता. त्यातील किती जागा भाजपा राखते महत्त्वाचे ठरणार आहे.- खडकवासला मतदारसंघात शिवसेनेचे बंडखोर रमेश कोंडे यांची बंडखोरी शमविण्यात यश आले. मात्र, कसब्यातून शिवसेनेचे विशाल धनवडे यांची बंडखोरी कायम आहे. त्यामुळे युतीतील कार्यकर्त्यांचे पूर्णपणे मनोमिलन झाले, अशी परिस्थिती नाही.

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019