शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

Maharashtra election 2019 :मनमोहनसिंग यांना अर्थशास्त्रातील प्राथमिक गोष्टी समजत नाहीत 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 6:28 PM

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना अर्थशास्त्रातील प्राथमिक गोष्टी समजत नाहीत, अशी टीका रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी बॅनर्जी यांच्याबाबत बोलताना केली. ‘नोबेल विजेते भारतीय वंशाचे अभिजित बॅनर्जी यांचे अभिनंदन, मात्र ते डाव्या विचारसरणीचे आहेत व त्यांचा तो विचार भारताने नाकारलेला आहे, त्या विचारांना भारतात थारा नाही असेही ते म्हणाले. 

पुणे : माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना अर्थशास्त्रातील प्राथमिक गोष्टी समजत नाहीत, अशी टीका रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी बॅनर्जी यांच्याबाबत बोलताना केली. ‘नोबेल विजेते भारतीय वंशाचे अभिजित बॅनर्जी यांचे अभिनंदन, मात्र ते डाव्या विचारसरणीचे आहेत व त्यांचा तो विचार भारताने नाकारलेला आहे, त्या विचारांना भारतात थारा नाही असेही ते म्हणाले. 

    विधानसभा निवडणूक प्रचारासाठी पुण्यात आलेल्या गोयल यांनी शुक्रवारी (ता. १८) माध्यम प्रतिनिधींबरोबर संवाद साधला. नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी यांच्याबद्धल बोलताना ते म्हणाले, बॅनर्जी यांचे नोबेल पुरस्काराबद्धल अभिनंदन. मात्र ते कोणत्या विचारांचे आहेत ते सगळ्यांना माहिती आहे. ते डाव्या विचारांचे आहेत. काँग्रेसने गरिबांसाठी आणलेल्या न्याय योजनेला त्यांनी पाठिंबा दिला होता. त्यांच्या विचारांना भारताने नाकारले आहे.

         मनमोहनसिंग यांच्यावरही गोयल यांनी टीका केली. त्यांना अर्थशास्त्रातील प्राथमिक गोष्टीही माहिती नाहीत असेच दिसते. त्यांच्याच काळात अनेक घोटाळे झाले. नेतृत्वाच्या भीतीने त्यांनी त्यावर निर्णय घेतले नाहीत. एकदोन नव्हे तर कोट्यवधी रूपयांचे घोटाळे झाले तरीही त्यांनी काही केले नाही. त्यांनी देशाला लाचारीच्या अवस्थेत सोडले होते. आम्ही गेल्या ५ वर्षात देशाला समर्थ केले, मात्र तेही त्यांना समजत नाही याचे आश्चर्य वाटते. त्यांच्या काळात व्याजदर कमी होता. त्यात आम्ही वाढ केली. देशहित सोडून ते पक्षहित पहात होते, त्यामुळे उद्योग तसेच अर्थव्यवस्थेचेही हानी झाली होती.       भारतीय रेल्वे ही देशाची संपत्ती आहे. त्याचे कधीही खासगीकरण केले जाणार नाही. याबाबतच्या बातम्या निराधार आहेत. त्यांच्या काळात रेल्वेची वाढ झाली नाही. आम्ही ती केली. गुंतवणूक वाढवली. अर्थव्यवस्थाही आम्ही सुदृढ करणारच. जागतिक परिस्थितीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काहीही परिणाम होणार नाही. ५ ट्रिलियनच्या अर्थव्यवस्थेतील १ ट्रिलियन महाराष्ट्राचे असतील असे गोयल म्हणाले. गुरूवारी पुण्यात झालेल्या मोदी यांच्या सभेचाही त्यांनी उल्लेख केला व राज्यात युतीचेच सरकार परत येईल असा विश्वास व्यक्त केला. खासदार गिरीश बापट, भाजपाचे शहर सरचिटणीस गणेश बीडकर, उज्वल केसकर यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलManmohan Singhमनमोहन सिंगPoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019