शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : गृहमंत्री अमित शहा यांचा शिरूरला रोड शो 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 11:44 IST

पाबळ फाट्यापासून ते विद्याधाम प्रशाला कॉर्नर असे रोड शोचे नियोजन

ठळक मुद्देनागरिकांची गर्दी : उशीर झाल्याने कार्यक्रम करावे लागले रद्द

शिरूर : शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार बाबुराव पाचर्णे यांच्या प्रचारार्थ आयोजित देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा रोड शो झाला. शहा यांनी ४० मिनिटांत हा रोड शो आटोपला. शहा यांना येण्यास उशीर झाल्याने शिरूरमधील त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले.  अमित शहा यांच्या रोड शोचे रविवारी ३ वाजता आयोजन करण्यात आले होते. दुपारपासून लोकांनी शहरातून जाणाऱ्या पुणे-नगर रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. पाबळ फाट्यापासून ते विद्याधाम प्रशाला कॉर्नर असे रोड शोचे नियोजन होते. यादरम्यान ते येथील बाजार समितीतील शिवाजीमहाराजांच्या तसेच डॉ. आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास हार घालण्याचे नियोजन होते. यानंतर येथील जैन मंदिरात ते दर्शन घेणार होते. गुरुमहाराज त्यांना मंगळीक देणार होते. यानंतर नगर परिषदेसमोर ते जनतेशी संवाद साधणार होते. पण अमित शहा यांना येण्यास उशीर झाला. ते शिरूरमध्ये पाचला पोहोचले. उशीर झाल्याने सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले. केवळ रोड शो करून ते पुढील कार्यक्रमास रवाना झाले. त्यांच्या रोड शोला प्रचंड प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी  शहा यांच्यावर पुष्पवृष्टी केली, तसेच हार घातले. शहा यांनी नागरिकांना अभिवादन करून सर्व हार त्यांच्यात भिरकावले.  .......शहा रोड शोसाठी शहरात येणार म्हणून सीआरपीएफ, एसपीजी, जिल्हा पोलीस असा दोनशे पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. .........परिसरातील इमारतींवर पोलीस टेहळणी करण्यासाठी तैनात होते. यामुळे या परिसराला छावणीचे रूप आले होते. 

टॅग्स :ShirurशिरुरAmit Shahअमित शहाBJPभाजपाElectionनिवडणूक