शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra election 2019 : अजित पवार यांच्याविरोधात गोपीचंद पडळकर उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 19:36 IST

अजित पवार यांच्याविरोधात गोपींचंद पडळकर यांचा अ‍ॅक्टिव्ह मोड..

ठळक मुद्देबारामती येथे पडळकर यांचा पत्रकारांशी संवाद बारामती मतदारसंघात मतदारांना महत्व नाही पुढाऱ्यांनी पुढाऱ्यांच्या कार्यकर्त्यांसाठी चालविलेली लोकशाही असल्याचे बारामतीत चित्र भाजपशिवाय धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत कोणताही पक्ष सकारात्मक नाही..

बारामती : अखेर राज्यात बहुचर्चित आणि लक्षवेधी असणाऱ्या बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याविरोधात भाजपच्या वतीने गोपींचंद पडळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे वेटिंगमोडवर असणारे पडळकर आता अ‍ॅक्टिव्ह मोडमध्ये आहे. पडळकर उमेदवारी अर्ज शुक्रवारी(दि ४) दुपारी दाखल करणार आहे.

बारामती येथे पडळकर यांनीच पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. यावेळी माळेगांव कारखान्याचे चेअरमन रंजन तावरे,ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे,जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांच्या उपस्थित होते.भाजपच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव न आल्याने अजित पवार यांच्याविरोधात कोण याची उत्सुकता ताणली होती. मात्र, आता ती उत्सुकता संपली आहे.

 पडळकर म्हणाले, बारामती मतदारसंघात अनेक मुद्दे आहेत. आमच्या विरोधकांकडे गेली ४० ते ५० वर्ष महाराष्ट्राची सत्ता होती. संपुर्ण महाराष्ट्राने येथील नेत्यांना विश्वास ठेवुन संधी दिली होती. भाजपचा अजेंडा सर्वसामान्य माणुस भयमुक्त असला पाहिजे असा आहे. मात्र, बारामती मतदारसंघात मतदारांना महत्व नाही . मतदान ही अमुल्य प्रक्रिया आहे. याठिकाणी पुढाऱ्यांनी पुढाऱ्यांच्या कार्यकर्त्यांसाठी चालविलेली लोकशाही असल्याचे चित्र आहे. ते आम्हाला मोडीत काढायचे आहे. येथील मतदारांना मताची किंमत समजु दिली नाही . यामध्ये बदल करण्यासाठी बारामतीच्या लोकांसमोर जाणार असल्याचे पडळकर म्हणाले.

पडळकर यांनी सांगितले की, धनगर समाजाला आरक्षण मिळावे,या हेतुने भाजपमधुन बाहेर पडलो .यामध्ये माझा कोणताही हेतु नाही..मला आमदारकी,खासदारकी मिळावी,म्हणुन भाजप सोडले नाही. मुलगा रडल्याशिवाय आई दुध पाजत नाही.या भावनेतुन भाजप विरोधात राज्यभर आंदोलन केले. राज्यभर ३० ते ३५ मेळावे घेतले. १६ नोव्हेंबर २०१८ ला बिरोबाच्या प्रांगणात राज्यातील समाजाचा मोठा मेळावा घेतला. ८ ते १० लाख लोक उपस्थित होते.समाजाला आरक्षण मिळावे,यासाठी सरकारवर मोठा दबाव आणला. विरोबाची शपथ  सरकारने आमचा प्रश्न सोडवावा यासाठी घातली होती.मला वैयक्तिक काही मिळावे,यासाठी घातलेली नव्हती. भाजपशिवाय धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत कोणताही पक्ष सकारात्मक आहे, असे मला वाटत नाही. आमच्याशी कोणी पाच मिनिटे बोलायला तयार नव्हते. आम्हाला १ हजार कोटींचे पॅकेज दिले आहे. आदिवासींच्या २२ योजना लागु केल्या आहेत. अहिल्यादेवींचे विद्यापीठाला नाव दिले.त्यामुळे आमच्या उर्वरीत मागण्या पुर्ण होतील,अशी आमची भावना असल्याचे पडळकर म्हणाले.—————————————————

टॅग्स :BaramatiबारामतीGopichand Padalkarगोपीचंद पडळकरAjit Pawarअजित पवारElectionनिवडणूकBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस