शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
2
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
3
विश्वासघातकी ट्रम्प! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेची पाकिस्तानसोबत सीक्रेट डील; भारताची चिंता वाढली
4
टाटा अल्ट्रोजपासून हॅरियरपर्यंत, 'या' ६ कार्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट! वाचू शकतात १.४० लाख रुपये
5
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
6
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
7
सोन्या-चांदीला टक्कर! 'या' मौल्यवान धातूच्या किमतीत ७०% ची मोठी वाढ; दागिन्यातही होतो वापर
8
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
9
पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
10
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह उघडले या कंपन्यांचे शेअर्स
11
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
12
"त्याने दुसऱ्या महिन्यातच धोका दिला", अखेर धनश्रीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलने सोडलं मौन, म्हणाला- "जर मी चीट केलं असतं..."
13
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
14
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
15
थरार! आरटीओला घाबरुन ट्रक पळवला, धडक झाली अन् २०० सिलेंडरांचा स्फोट झाला!
16
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
17
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
18
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
19
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...

Maharashtra Election 2019 : वडगाव शेरीत राष्ट्रवादीला खिंडार: माजी आमदार बापू पठारे भाजपमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 12:02 IST

पक्षाने मला वाईट वागणूक दिली...

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बापू पठारे यांनी सोमवारी रात्री भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर मुंबईत हा प्रवेश झाला. आमदार जगदीश मुळीक यांच्यासमवेत पठारे सोमवारी सायंकाळी वडगावशेरीतून मुंबईला रवाना झाले. राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठाच धक्का बसला असून, भाजपने निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात त्यांना खिंडीत गाठले आहे.राष्ट्रवादीचे या मतदारसंघातील उमेदवार सुनील टिंगरे यांना याचा जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीबरोबर  बोलताना पठारे म्हणाले, पक्षाने मला वाईट वागणूक दिली. मुंबईत पक्षाची बैठक झाली, त्याचे मला निमंत्रणसुद्धा नव्हते. टिंगरे किंवा आपण अशी कोणालाही उमेदवारी मिळाली तरी काम करायचे असे ठरले होते, मात्र आपल्याला सामावून घेतले गेले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या दबावातून हा निर्णय घ्यावा लागला. अमदार मुळीक गेले काही दिवस पठारे यांच्या सातत्याने संपर्कात होते. त्यांनीच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तुमचा प्रवेश घडवतो असे सांगत पठारे यांना राजी केले असल्याची चर्चा आहे.भाजपचे आमदार जगदीश मुळीक यांनी प्रयत्नर्पुूाक पठारे यांना प्रवेशासाठी तयार केले असल्याचे सांगण्यात येते. सुनील टिंगरे हे मागील वेळी थोड्याच मतांनी पराभूत झाले होते. त्या वेळी त्यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेतून उमेदवारी केली होती. मात्र पालिका निवडणुकीच्या वेळी ते परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. आता विधानसभेच्या उमेदवारीसाठी त्यांनी पठारे यांच्यावर मात केली. तेव्हापासूनच पठारे नाराज होते. पठारे यांनीही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे, मात्र त्यानंतर म्हणजे सन २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. आता पठारे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला ऐननिवडणुकीच्या तोंडावर खिंडीत गाठले आहे.  

टॅग्स :Puneपुणेvadgaon-sheri-acवडगाव शेरीElectionनिवडणूकPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा