शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Maharashtra Election 2019 : मुख्यमंत्री दिल्लीच्या नेत्यांच्या भाषणाचे मराठीत भाषांतर करुन बोलतात : सुप्रिया सुळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 13:51 IST

दिल्लीतील नेते महाराष्ट्रात येऊन कलम ३७० वर बोलतात व शरद पवारांवर टीका करतात...

ठळक मुद्देजगताप यांच्या प्रचारार्थ शिवरीत मेळावा : भाजप सरकारने पाच वर्षांत काय काम केले हे सांगावे,

सासवड : राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीहून आलेल्या नेत्यांच्या भाषणाचे मराठीत भाषांतर करून सांगतात. स्थानिक प्रश्नावर बोलत नाहीत. दिल्लीतील नेते महाराष्ट्रात येऊन कलम ३७० वर बोलतात व शरद पवारांवर टीका करतात. पाच वर्षांत काय काम केले हे सांगावे, असे प्रतिपादन बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. पुरंदरमधील आघाडीचे उमेदवार संजय जगताप यांच्या प्रचारासाठी शिवरी येथे मेळावा घेण्यात आला. त्यावेळी त्या बोलत  होत्या.सुप्रिया सुळे म्हणाल्या, की दौंड, बारामती येथे अद्ययावत प्रशासकीय इमारती झाल्या, परंतु पुरंदरला झाली नाही, जेजुरी एमआयडीसीमधील ८० टक्के कारखाने बंद आहेत, दुधाला भाव नाही, शेतमालाला भाव नाही, पाच वर्षांत काय काम केले हे सांगावे. पुरंदरमधील जलयुक्त शिवारकामात तीनशे कोटींचा भ्रष्टाचार झाला, असे त्याच खात्याचे मंत्री सभागृहात सांगतात, त्या प्रकरणाची चौकशी आता संजय जगताप आमदार झाल्यावर त्यांनी करावी, असेही सुळे म्हणाल्या. दोन्ही काँग्रेस पक्षाची आघाडी झाल्याने पुरंदरचा आमदार आघाडीचाच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संभाजी झेंडे यांनी दिवे येथील आतंरराष्ट्रीय बाजार ही एक अफवा असल्याचे सांगितले. सुदाम इंगळे यांनी थापाड्या माणसाला घरी बसवणार असल्याचे सांगितले. यावेळी निरीक्षक हरीश सणस,  प्रा. दिगंबर दुर्गाडे, दत्ता झुरंगे, अशोक टेकवडे, माणिकराव झेंडे-पाटील, प्रदीप पोमण यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमास मार्तंड भोंडे, वीणा सोनवणे, प्रदीप लांडगे, मोहन वांढेकर, शिवाजी पोमण, बाळासाहेब कामथ यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़ ......४उमेदवार संजय जगताप यांनी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यावर कडक भाषेत टीका केली, दहा वर्षांत एकही काम पूर्ण केले नाही, गुंजवणी धरण पाणी योजना, चौपदरी रस्ता अशी कामे केली नाहीत व आता मी काम अडविले, अशी टीका करीत आहेत. पाच वर्षे गप्प बसले व आता कोर्टाचे कारण सांगत आहेत. पुरंदरमध्ये इथून पुढे काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्रच राहतील व जनतेचे प्रश्न सोडवतील, असेही जगताप म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसdelhiदिल्लीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस