शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 19:57 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आज बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीची रमधुमाळी सुरू झाली असून आज महायुतीकडून अजित पवार यांनी तर महाविकास आघाडीकडून युगेंद्र पवार यांनी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर सभेत बोलताना अजित पवार भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. कुटुंबातीलच उमेदवार विरोधात असल्यामुळे पवार भावुक झाले, यावेळी यांनी 'आई सांगत होती माझ्या दादाविरोधात फॉर्म भरु नका' , असं अजित पवार म्हणाले. या विधानाला आता त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी प्रत्युत्तर दिले. 

आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!

एबीपी माझा या वृत्तवाहिनीला श्रीनिवास पवार यांनी मुलाखत दिली. यावेळी बोलताना श्रीनिवास पवार म्हणाले, ही सभा ऐकली नाही. माध्यमांमधून अजित पवार असं म्हणाले हे समजले. पण, आईने असं काही भाष्य केलेलं नाही. दादा का बोलले त्यांचं त्यांना माहिती. कारण आईला दादा आहेत तसं युगेंद्र आहे. तिला दोन्ही सारखेच आहेत. आई कधी राजकारणावर भाष्य करत नाही, असंही श्रीनिवास पवार म्हणाले. 

"गोष्ट मी चूक , मी चूक तेव्हासुद्धा मी त्याला करु नको म्हणून सांगत होतो. आपल्या घरातील ती आपली लहान बहीण आहे. पहिलं पाऊलं तिने आपल्यासमोर टाकलंय, तिच तुझ्यावर खूप प्रेम आहे.  त्यामुळे तु हे करु नको. तर त्यांचं माझ ठरलंय हेच वाक्य होतं. माझा राजकारणात काहीच संबंध नाही, माझा मुंबईत आणि इकडे व्यवसाय आहे. पण साहेबांना खूपच एकट पाडलं म्हणून मी आलो, आईने युगेंद्रच्या उमेदवारीला विरोध केला असं काही नाही, युगेंद्र आईसोबत बोलत होता तेव्हा तिने तुला हव काय योग्य वाटत ते कर शेवटी मला दोघेही सारखेच, असंही श्रीनिवास पवार म्हणाले. 

श्रीनिवास पवार म्हणाले, तुम्हाला प्रत्येक व्यक्तीने हे करु नका म्हणून सांगितलं होतं, तरीही तुम्ही तेच केलं. युगेंद्र शरद पवार यांनाच फॉलो करतो. बारामती साहेबांच्या विचारांची आहे, आता अजित पवार शरद पवार यांच्या विचारांचे राहिले नाहीत. त्यांचे विचार भाजपाचे विचार आहेत, बारामती शरद पवार यांच्यासाठी महत्वाची आहे त्यामुळे त्यांना पाहिजे तो उमेदवार द्याला लागला, असं स्पष्ट पवार यांनी सांगितले. अजित पवार यांनी लोकसभेत सगळ्यांच्या नकला केल्या, आता त्यांच्यावर ती वेळ आली, आता ते लोकांना फोन करुन भेटायला बोलवत आहेत. आता त्यांचं भाषण लिहून दिलं जातं, त्यामुळे भाषणावर कंट्रोल आला आहे, असा टोलाही श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांना टोला लगावला.

'युगेंद्रच्या मागे शरद पवार'

"युगेंद्रच्या मागे शरद पवार आहेत.  पवार सगळ्यांना सांगतात मला सरकार बदलायचं आहे, युगेंद्रच्या मागे शरद पवार, सुप्रिया सुळे आहेत, असंही पवार म्हणाले. मी काही दिवसापूर्वी आईला भेटायला गेलो तेव्हा माझी आणि अजित पवार यांची भेट झाली होती तेव्हा थोड बोलण झालं होतं, आमच्या नात्यात बदल झालेला नाही, असंही श्रीनिवास पवार म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Puneपुणेbaramati-acबारामतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार