शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात उद्धवसेनेचे चंद्रकांत मोकाटे, मनसेचे शिंदे, तिरंगी लढतीचा फायदा कोणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 10:18 IST

Maharashtra Assembly Election 2024: चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात उद्धवसेनेचे चंद्रकांत मोकाटे रिंगणात आहेत. चंद्रकांत मोकाटे यांनी यापूर्वीही या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे. मनसेने किशोर शिंदे यांना पुन्हा मैदानात उतरवले असून किशोर शिंदे यांनी २०१९ ला पाटील यांच्याविरोधात चांगली लढत दिली होती. 

- सचिन कापसे पुणे - चंद्रकांत पाटील यांच्यासाठी २०१९च्या विधानसभेला भाजपच्या स्टँडिंग आमदार मेधा कुलकर्णी यांना थांबविण्यात आले होते. त्यानंतर मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली तर याच मतदारसंघातील मुरलीधर मोहोळ केंद्रात राज्यमंत्री झाले. सुरुवातीला बंडाचा झेंडा हाती घेतलेले माजी नगरसेवक अमोल बालवडकरही आता चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत कलहाचा मुद्दा मागे पडला असून आता उद्धवसेना आणि मनसेचे तगडे आव्हान पाटील यांच्यासमोर असणार आहे. 

चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात उद्धवसेनेचे चंद्रकांत मोकाटे रिंगणात आहेत. चंद्रकांत मोकाटे यांनी यापूर्वीही या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे. मनसेने किशोर शिंदे यांना पुन्हा मैदानात उतरवले असून किशोर शिंदे यांनी २०१९ ला पाटील यांच्याविरोधात चांगली लढत दिली होती. 

तिरंगी लढतीचा फायदा कोणाला होणार?  कोथरूडमध्ये २०१९ ला मनसेच्या किशोर शिंदे यांना ७९७५१ मते मिळाली होती. तेव्हा दुरंगी झालेली लढत यंदा तिरंगी होणार असून या लढतीमुळे मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन होणार आहे. या विभाजनाचा फटका महाआघाडीला बसेल की महायुतीला, हे पाहणे औत्युक्याचे ठरेल. 

लोकसभेमध्ये काय घडले, परिणाम काय?- लोकसभेला मुरलीधर मोहोळ निवडून आल्यामुळे, तसेच राज्यसभेवर मेधा कुलकर्णी यांना संधी दिल्यामुळे कोथरूड विधानसभा मतदारसंघातील अंतर्गत दावेदारी संपुष्टात आली. त्यामुळे भाजप आणि इतरमित्रपक्ष एकसंधपणे पाटील यांच्यासोबत आहेत. - एकेकाळी कोथरूड हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. आता तो भाजपचा बालेकिल्ला बनला असून भाजपचे दोन खासदार या मतदारसंघात आहेत. 

निवडणुकीतील कळीचे मुद्देकोथरूड परिसरातील अनेक सोसायट्यांना पाणीपुरवठा आणि पार्किंगची समस्या भेडसावत असून या भागात वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. मतदारसंघात अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kothrud-acकोथरुडchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाMNSमनसे