शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2024 Result: भाजपच पुण्याच्या राजकारणातील ‘दादा’; काँग्रेस पुन्हा एकदा शून्यावर, शरद पवारांकडे १ जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 13:32 IST

maharashtra assembly election 2024 result शिवाजीनगर, पर्वती, कोथरूड, खडकवासला, कॅन्टोन्मेंट या जागांवर भाजपने विद्यमान आमदारांनाच उमेदवारी

पुणे : निवडणूक जिंकण्याचे म्हणून एक तंत्र असते. त्यावर भारतीय जनता पक्षाने हुकमत बसवली आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनी शहरातील ८ पैकी ५ जागा कायम ठेवून १ जागा जास्तीची जिंकली आहे. उर्वरित दाेन जागा प्रत्येकी एकप्रमाणे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या आहेत. यावरून शहराच्या राजकारणातील ‘दादा’ आपणच आहोत, हे भाजपने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. त्याचवेळी काँग्रेस पक्ष मात्र पुन्हा एकदा शून्यावर राहिले आहे.

हे ठरले पुण्याचे कारभारी 

शहरातील शिवाजीनगर, पर्वती, कोथरूड, खडकवासला, कॅन्टोन्मेंट या जागांवर भाजपने विद्यमान आमदारांनाच उमेदवारी दिली. त्यांच्यातील काहींना थांबवणार अशी चर्चा होती; पण भाजपने त्यांच्यावर विश्वास ठेवत पुन्हा संधी दिली. यात भाजपचे सिद्धार्थ शिरोळे, माधुरी मिसाळ, चंद्रकांत पाटील, भीमराव तापकीर, सुनील कांबळे या विद्यमान आमदारांनी पुन्हा मैदान जिंकत पक्षाचा विश्वास सार्थ ठरवला आहे. विशेष म्हणले पाेटनिवडणुकीत हातातून निसटलेला कसबा विधानसभा मतदारसंघ पुन्हा खेचून आणण्यात भाजपला यश आले आहे. हेमंत रासने यांच्या रूपाने भाजपला पुण्यात सहावा आमदार मिळाला आहे. हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे चेतन तुपे हे आमदार पुन्हा निवडून आले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रशांत जगताप यांचा पराभव केला. वडगावशेरीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माजी आमदार बापू पठारे चुरशीच्या लढतीत विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना पराभूत केले.

काँग्रेस शून्यावरच

काँग्रेसला कसबा विधानसभा मतदारसंघातून यश मिळेल, याची आशा होतीच. शिवाय कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर या जागेवर देखील त्यांच्या उमेदवाराचा विजय हाेईल, अशी आशा हाेती. मात्र, उमेदवाराचे नाव निश्चित करण्यापासूनच पक्षात गोंधळ पाहायला मिळाला. नंतर बंडखोरी, मग गटबाजी, त्यानंतर प्रचारातील बेजबाबदारपणा या सगळ्यांचा चांगलाच धडा मतदारांनी त्यांना दिला. त्यांचे मनीष आनंद, कमल व्यवहारे, आबा बागूल हे बंडखोर फारसे चालले नाहीतच; पण अधिकृत म्हणून दिलेले उमेदवार दत्ता बहिरट, रवींद्र धंगेकर व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या अश्विनी कदम हे देखील फार चालले नाहीत. चुरशीची म्हणावी अशी लढत इथे झालीच नाही. वर्ष २०१९ व २०१४ या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस शून्यावर होती. त्यानंतर २०२३ च्या पोटनिवडणुकीत कसबा मतदारसंघातील १ जागा धंगेकर यांच्या नावाने त्यांना मिळाली हाेती. आता तीही गमावली आहे. एकूण ते पुन्हा एकदा शून्यावर आले आहेत.

दिल्लीत, राज्यात अन् लाेकल देखील भाजपच 

दिल्लीत, राज्यात आणि गल्लीतही आपलीच सत्ता असावी ही प्रत्येक राजकीय पक्षाची, त्यांच्या नेत्यांची व स्थानिक कार्यकर्त्यांचीही मनीषा असते. भाजपची ती मनीषा वर्ष २०१४ पासून पूर्ण होत आहे. आताही महापालिका वगळता तसेच झाले आहे. महापालिकेची निवडणूक जाहीर झाली तर...? या विचाराने भाजप त्याची तयारी आधीपासूनच करत आहे. निवडणूक जिंकण्याचे, तीसुद्धा सार्वत्रिक निवडणूक जिंकण्याचे एक तंत्र त्यांनी विकसित केले आहे. त्याचा वापर ते काटेकोरपणे करतात. त्यांच्यात गटबाजी होत नाही, त्यांच्यात कार्यकर्ते फुटत नाहीत, त्यांच्यात सांगितलेली सर्व कामे चोख केली जातात, त्यांच्यात परस्परांमध्येच पाडापाडीचा खेळ होत नाही. हेच ते तंत्र आहे. भाजपला ते जमले आहे, काँग्रेसच काय कोणालाही ते जमत नाही. त्यामुळेच शहराच्या राजकारणात आम्हीच ‘दादा’ आहोत, हे भाजपने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Madhuri Misalमाधुरी मिसाळchandrakant patilचंद्रकांत पाटीलparvati-acपर्वतीkothrud-acकोथरुडshivajinagar-acशिवाजीनगरBJPभाजपा