MAHAJYOTI: ‘महाज्याेती’तर्फे ऑक्टाेबरमध्ये पुन्हा प्रवेश परीक्षा; वेळापत्रक जाहीर
By प्रशांत बिडवे | Published: September 21, 2023 05:56 PM2023-09-21T17:56:20+5:302023-09-21T18:00:31+5:30
यापूर्वी महाज्याेतीच्या वतीने घेण्यात आलेल्या जुलै महिन्यांतील एमपीएससी आणि त्यानंतर यूपीएससी छाननी प्रवेश परीक्षेत गैरप्रकार घडल्याचे निदर्शनास आल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आल्या हाेत्या...
पुणे : महात्मा जाेतिबा फुले संशाेधन व प्रशिक्षण संस्था (महाज्याेती)तर्फे महाराष्ट्र लाेकसेवा आयाेग यासह एमपीएससी संयुक्त गट ब आणि क, यूपीएससी परीक्षा पूर्व प्रशिक्षण याेजनेंतर्गत विद्यार्थ्यांच्या छाननी परीक्षांचे पुन्हा ऑक्टाेबर महिन्यांत आयाेजन केले आहे. यापूर्वी महाज्याेतीच्या वतीने घेण्यात आलेल्या जुलै महिन्यांतील एमपीएससी आणि त्यानंतर यूपीएससी छाननी प्रवेश परीक्षेत गैरप्रकार घडल्याचे निदर्शनास आल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आल्या हाेत्या.
महाज्याेतीच्या वतीने परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची पुन्हा संगणकाच्या साहाय्याने परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी तिन्ही परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार महाराष्ट्र लाेकसेवा आयाेग राज्यसेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण यासाठी दि. २५ आणि २६ ऑक्टाेबर राेजी सकाळी १० ते १२ आणि दुपारी ३ ते ५ दाेन सत्रांत परीक्षा हाेणार आहे. उमेदवारांना १२ ऑक्टाेबरपासून www.mahajyoti.org.in संकेतस्थळावर प्रवेश पत्र उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
एमपीएससी गट ब आणि क परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी येत्या २७ ऑक्टाेबर राेजी सकाळी साडेनऊ ते साडेअकरा दुपारी १ ते ३ आणि साडेचार ते साडेसहा या तीन सत्रांत परीक्षा हाेतील, तर यूपीएससी (इंग्रजी व मराठी माध्यम) परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी दि. २९ ऑक्टाेबर राेजी सकाळी साडेनऊ ते साडेअकरा, दुपारी १ ते ३ आणि साडेचार ते साडेसहा या तीन टप्प्यात परीक्षा हाेणार आहेत, अशी माहिती महाज्याेतीच्या वतीने देण्यात आली.