शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

Mahahrashtra Election 2019 : हडपसरला विकासापासून वंचित ठेवत काँग्रेसवाल्यांनी केली फक्त घराणी मोठी : योगेश टिळेकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 13:12 IST

५०-५० वर्षांपासून या काँग्रेसवाल्यांनी प्रगतीपासून हडपसरला वंचित ठेवले होते

ठळक मुद्देससाणे लॉन्समध्ये भव्य कार्यकर्ता मेळावा आणि पक्ष प्रवेश

हडपसर : ५०-५० वर्षांपासून या काँग्रेसवाल्यांनी प्रगतीपासून हडपसरला वंचित ठेवले होते. त्यांची घराणी मोठी झाली. त्या व्यक्ती मोठ्या झाल्या, श्रीमंत झाल्या. पण सामान्य माणूस गरीब तो गरीबच राहिला, अशी टीका खासदार गिरीश बापट यांनी करीत योगेश टिळेकर केलेल्या विकासकामातून जनतेला न्याय दिला असल्याचे सांगितले.येथील महंमदवाडी येथील  ससाणे लॉन्समध्ये भव्य कार्यकर्ता मेळावा आणि जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित हजारो कार्यकर्त्यांसह माजी नगरसेविका विजया वाडकर यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी बापट बोलत होते.  याप्रसंगी पुण्याचे खासदार गिरीश बापट, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, आरपीआयच्या महिला आघाडी अध्यक्ष शशिकला वाघमारे, शिवसेनेच्या नगरसेविका संगीता ठोसर, आरपीआयच्या संगीता आठवले, शिवसेना हडपसर प्रमुख तानाजी लोणकर, भाजपा ओबीसी आघाडी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विकास रासकर, नगरसेवक मारुती तुपे, शिवसेना नगरसेवक नाना भानगिरे, कार्यक्षम नगरसेवक संजय घुले, नगरसेविका प्राची आल्हाट, नगरसेवक उमेश गायकवाड, नगरसेविका रंजना टिळेकर, वृषाली कामठे, वीरसेन जगताप, मनीषा कदम, शिवसेना युवा नेते राजेंद्र बाबर, आरपीआयचे संतोष खरात, शिवसेना विभाग प्रमुख योगेश कांबळे, हिंदवी स्वराज्य संघटना अध्यक्ष अभी बोराटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष भूषण तुपे, जिल्हा परिषद सदस्य वंदना कोद्रे, जिल्हा परिषद सदस्य जितूशेठ भंडारी, निवडणूक समन्वयक रवी तुपे, युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विराज तुपे,  संदीप दळवी, संजय सातव, शिवसेना ज्येष्ठ नेते अप्पासाहेब गायकवाड, सरपंच शिवराज घुले, उपसरपंच पुरुषोत्तम धारवाडकर, महायुतीचे  सर्व पदाधिकारी महिला आदी उपस्थित होते.अनेक योजना आणून पुणे शहर आणि हडपसरमध्ये विकासाची गंगा आणण्याचे काम टिळेकर यांच्या माध्यमातून झाली आहेत. विकासकामासाठी निधी आणण्यासाठी सक्षम उमेदवार निवडून दिला पाहिजे, असे सांगून बापट यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. 

टॅग्स :Hadapsarहडपसरgirish bapatगिरीष बापटBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस