शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'क्यूनेट फसवणूक प्रकरणात महाविकास आघाडी सरकारने गुन्हेगारांना पाठीशी घातले' माधव भंडारी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 18:23 IST

सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणात आरोपींना सहाय्य केले. असा आरोप माधव भंडारी यांनी केला.

पुणे : क्यूनेट कंपनीच्या माध्यमातून राज्यात साडेनऊ ते दहा लाख लोक आणि देशात सुमारे ५० लाख जणांची गुंतवणुकीच्या माध्यमातून ५० हजार कोटी पेक्षा अधिकची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा प्रयत्न करून महाविकास आघाडी सरकारने  गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम केले आहे. फडणवीस सरकारने संबंधित कंपनीवर कारवाई सुरू केली होती. मात्र, त्यानंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणात आरोपींना सहाय्य केले आहे, असा  आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी पत्रकार परिषदेत केला. भंडारी म्हणाले, आघाडी सरकारचे सर्वोच्च न्यायालयातील वकील राहुल चिटणीस यांनी तत्कालीन राज्य सरकारच्या निर्देशानुसार विशेष तपास पथक प्रमुख यांना एक मसुदा  पाठवला होता.  त्यात रिकाम्या जागा ठेऊन सह्या करून मसुदा पाठवण्यास सांगितले. त्यावर २९ फेब्रुवारी २०२० रोजी एसआयटी प्रमुख दिलीप देशमुख यांनी दोन पानी उत्तर पाठवले. तुमचे मसुद्याचे पत्र न्यायालयात हजर केले तर ते खोटे प्रतिज्ञापत्र दाखल करणे माझ्याकडून घडेल. मी जे पुरावे सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत सादर केलेले प्रतिज्ञापत्र खोटे ठरेल त्यामुळे मी सही करणार नाही. त्यावर राज्य सरकारने एसआयटी बरखास्त केली आणि अधिकाऱ्यांची बदली केली. संबंधित कंपनीचे तीन मुख्य संचालकांपैकी एक संचालक श्रीलंकेत रहिवासी असून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांशी त्याचा संबंध आहे अशा लोकांना आघाडी सरकार पाठबळ का देते याबाबत त्यांनी खुलासा करावा असे माधव भंडारी यांनी सांगितले.शरद पवार आपण पूर्वी नेमके काय केले हे विसरून जातातव्होट जिहाद बाबत शरद पवार यांनी  टीका केली. याबाबत बोलताना भंडारी म्हणाले, खासदार शरद पवार आपण पूर्वी नेमके काय केले हे विसरून जातात. धर्माच्या नावावर मते द्या असे आव्हान त्यांच्या पक्षासाठी केले गेले. तर त्याबाबत धार्मिक राजकारण नसते. पण व्होट जिहाद बाबत ते दुटप्पी राजकारण करत आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे देखील पवार यांच्या सोबत राहून त्यांच्या सारखे बोलायला लागले आहे असे माधव भंडारी यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी