LPG सिलिंडर महागलाय? टेन्शन सोडा! आता बायोगॅसवर करा स्वयंपाक; सरकारकडून मिळतेय 'एवढे' मोठे अनुदान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 13:18 IST2026-04-04T13:13:45+5:302026-04-04T13:18:54+5:30

How to Get Biogas Subsidy: आखातातील युद्धामुळे देशात एलपीजी गॅस सिलिंडरची टंचाई उद्भवली आहे. सिलिंडरच्या टंचाईमुळे पुणे शहरातील व ...

LPG Shortage Alert: Switch to Biogas and Get Government Subsidy Up to 29,250 Instantly know the process | LPG सिलिंडर महागलाय? टेन्शन सोडा! आता बायोगॅसवर करा स्वयंपाक; सरकारकडून मिळतेय 'एवढे' मोठे अनुदान!

LPG सिलिंडर महागलाय? टेन्शन सोडा! आता बायोगॅसवर करा स्वयंपाक; सरकारकडून मिळतेय 'एवढे' मोठे अनुदान!

How to Get Biogas Subsidy: आखातातील युद्धामुळे देशात एलपीजी गॅस सिलिंडरची टंचाई उद्भवली आहे. सिलिंडरच्या टंचाईमुळे पुणे शहरातील व उपनगरातील नागरिकांची धावपळ सुरू असताना तारांबळ उडत आहे. पर्यावरणपूरक आणि स्वस्त पर्याय म्हणून बायोगॅस अर्थात गोबरगॅस पुन्हा चर्चेत आला आहे. शासनाकडून घरगुती बायोगॅस संयंत्रासाठी आकर्षक अनुदानही दिले जात आहे. बायोगॅस हा ग्रामीण भागासाठी अत्यंत उपयुक्त आणि पर्यावरणपूरक पर्याय आहे. शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक ठिकाणी सिलिंडर मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असून, पर्यायी इंधनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

- गॅस सिलिंडरसाठी नागरिकांची वणवण सुरूच :

आखातातील युद्धामुळे गॅस सिलिंडर टंचाईची सर्वाधिक झळ ही शहराला लागली. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना गॅस सिलिंडरसाठी रांगाच रांगा लावाव्या लागल्या तर काही ठिकाणी गॅस उपलब्ध झाला नाही. यामुळे गॅस सिलिंडरसाठी नागरिकांची तारांबळ उडाली. यामुळे पर्यायी मार्ग म्हणून सरकारने बायोगॅस प्रकल्पासाठी प्रोत्साहन अनुदान दिले आहे.

- असे मिळते अनुदान

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रम (एनबीएमएमपी) अंतर्गत घरगुती बायोगॅस संयंत्र उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. ग्रामीण भागात पर्यावरणपूरक ऊर्जेचा बायोगॅस हा प्रभावी पर्याय उपलब्ध आहे. घरगुती बायोगॅस संयंत्रासाठी जवळपास १४,३५० ते २९,२५० रुपयांपर्यंत (संयंत्राच्या आकारानुसार) अनुदान मिळू शकते. शौचालय जोडणी असल्यास अतिरिक्त १६०० रुपयांचे अनुदान मिळते.

- कागदपत्रे आवश्यक

बायोगॅस संयंत्रासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांकडे स्वतःची जागा आणि पशुधन असणे आवश्यक आहे. आधारकार्ड, बँक खाते, जमीन कागदपत्रे, फोटो आदी कागदपत्रे आवश्यक असतात.

- येथे अर्ज करावा

अर्जदारांनी संबंधित तालुका कृषी कार्यालय, पंचायत समिती किंवा अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करावा. स्थानिक कृषी सहायकांकडूनही मार्गदर्शन मिळू शकते.

----------------

Web Title : एलपीजी महंगी? बायोगैस से खाना बनाएं; सरकार दे रही सब्सिडी!

Web Summary : एलपीजी की कमी से परेशान हैं? बायोगैस एक पर्यावरण-अनुकूल विकल्प है, जिस पर सरकारी सब्सिडी उपलब्ध है। बायोगैस संयंत्रों के लिए 29,250 रुपये तक प्राप्त करें, साथ ही शौचालय कनेक्शन के लिए अतिरिक्त। अपने स्थानीय कृषि कार्यालय में आवेदन करें।

Web Title : LPG price rise? Cook with biogas; government subsidy available!

Web Summary : Facing LPG shortages? Biogas offers an eco-friendly alternative, with government subsidies available. Get up to ₹29,250 for biogas plants, plus extra for toilet connections. Apply at your local agriculture office with required documents.