शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

LPG Gas Crisis : 'फूड डिलिव्हरी बॉइज'च्या आयुष्यात आखातातील संघर्षामुळे आर्थिक युद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 13:31 IST

- ऑर्डर्स घटल्याने कमाई निम्म्यावर : हॉटेल्स आणि क्लाउड किचन बंद पडू लागली; परिस्थिती सुधारली नाही, तर बेरोजगारीची टांगती तलवार; घरखर्च, बाइकचे हप्ते अन् पेट्रोल न परवडणारे

 - आकाश झगडे पिंपरी : शहरात दिवस-रात्र धावणाऱ्या फूड डिलिव्हरी बॉइजच्या आयुष्यात सध्या आर्थिक युद्ध सुरू झाले आहे. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर शहरात हॉटेल्स आणि क्लाउड किचन बंद पडू लागल्याने, डिलिव्हरी बॉइजच्या दररोजच्या कमाईत ४० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. घरखर्च, बाइकचे हप्ते आणि पेट्रोलचे दर यामुळे त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे.

युद्धजन्य परिस्थितीच्या आधी डिलिव्हरी बॉय दिवसाला सरासरी १० ते १२ तासांच्या कामात ८०० ते १२०० रुपये कमवत. तीस टक्के हॉटेल्स बंद झाल्याने ग्राहकांनी ऑनलाइन जेवण मागवणे कमी केले आहे. पूर्वी तासाला ३-४ ऑर्डर्स मिळायच्या, तिथे आता २-३ तास वाट पाहून एकही ऑर्डर मिळत नाही. सध्या त्यांची दिवसाची कमाई ३०० ते ४०० रुपयांपर्यंत खाली आली आहे. यातून पेट्रोलचा खर्च वजा केल्यास हातात जेमतेम २०० रुपये उरत आहेत.   हप्ते आणि कौटुंबिक जबाबदारीचे ओझेबहुतांश डिलिव्हरी बॉइजनी कर्ज काढून दुचाकी घेतल्या आहेत. उत्पन्नात पन्नास टक्के घट झाल्याने बाइकचे हप्ते थकण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेक तरुण ग्रामीण भागातून शहरात आले आहेत. रूमचे भाडे आणि मेसचा खर्च भागवणे आता त्यांना अशक्य होत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मी फूड डिलिव्हरीचे काम करत आहे. आधी लॉगिन केले की, १०-१५ मिनिटांत ऑर्डर यायची. आता लवकर ऑर्डर येत नाही. बाहेर बसून राहावे लागत आहे. -  स्वप्नील लोंढे, डिलिव्हरी पार्टनर.

आमचे गणित साधे आहे, जास्त ऑर्डर्स म्हणजे जास्त कमाई. पण, आता दिवसभर उन्हातान्हात फिरूनही हातात जेमतेम ४००-५०० रुपये पडतात. त्यातले अर्धे पैसे बाइकच्या पेट्रोलमध्येच जातात. हातावर पोट असणाऱ्यांवर याचा जास्त परिणाम होत आहे. - अक्षय वाघामारे, डिलिव्हरी पार्टनर

English
हिंदी सारांश
Web Title : Gulf conflict triggers financial woes for food delivery boys.

Web Summary : Pimpri's food delivery boys face economic hardship as hotel closures slash earnings by 40% due to Gulf tensions. Reduced orders leave them struggling with expenses, loan repayments, and fuel costs, pushing some towards unemployment.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेFuel Crisisइंधन टंचाईFuel Hikeइंधन दरवाढLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाई