शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

LPG Gas Crisis: गॅसटंचाईने जेजुरीतील हॉटेल व्यवसाय संकटात; १३० हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 17:52 IST

- भाविकांची वाढती गर्दी, पण व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा; हॉटेल व्यावसायिकांची पत्रकार परिषदेत सरकारकडे मदतीची मागणी

जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत यात्रा, जत्रा, लग्नसराई आणि शाळांच्या सुट्ट्यांमुळे भाविकांची संख्या वाढत असताना, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तीव्र टंचाईमुळे येथील हॉटेल व्यवसाय अडचणीत आला आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास जेजुरीतील सुमारे १३० हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती जेजुरी व पंचक्रोशी हॉटेल असोसिएशनने दिली.

आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर जेजुरी व पंचक्रोशी हॉटेल असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन आपल्या अडचणी मांडण्यात आल्या.

जेजुरी हे खंडोबा देवाचे प्रमुख तीर्थक्षेत्र असल्याने येथे वर्षभर यात्रा, जत्रा, कुलधर्म-कुलाचार, लग्नसराई यामुळे भाविकांची वर्दळ असते. सध्या भाविकांची संख्या वाढली असली, तरी हॉटेल व्यावसायिकांना गॅस सिलिंडर मिळत नसल्याने व्यवसाय चालवणे कठीण झाले आहे. शासनाने २० टक्के व्यावसायिक गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केली असली, तरी गेल्या १५ दिवसांत एकही सिलिंडर उपलब्ध झाला नसल्याने हॉटेल, धाबे आणि खाद्यपदार्थांची दुकाने बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे असोसिएशनचे प्रमुख विजय झगडे यांनी सांगितले.

गॅसला पर्याय म्हणून काही हॉटेल्समध्ये सरपण व कोळशावर चुली पेटवून पदार्थ तयार केले जात आहेत. मात्र, सुमारे दीडशे पदार्थांपैकी केवळ दहा-बारा पदार्थच तयार करता येत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. हॉटेल बंद केल्यास कामगार निघून जातील आणि पुन्हा कामगार मिळणे कठीण होईल, या भीतीने हॉटेल्स कसाबसा सुरू ठेवण्यात येत आहेत. भाविकांना अपेक्षित नाश्ता व जेवण मिळत नसल्याने त्याचा परिणाम पर्यटन व व्यवसायावर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

जेजुरी येथील यात्रा-जत्रांच्या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने व्यावसायिक गॅस उपलब्ध करून द्यावा, यासाठी हॉटेल व्यावसायिकांचे शिष्टमंडळ अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची भेट घेणार असल्याचे विजय झगडे यांनी सांगितले. यावेळी आप्पा बयास, पंकज रहाटेकर, गणेश गाढवे, अक्षय दरेकर आदी व्यावसायिकांनी आपल्या अडचणी मांडल्या.

दरम्यान, जेजुरी येथील शहीद शंकर शिंदे गॅस एजन्सीचे संचालक सागर शिंदे यांनी ७ मार्चपासून व्यावसायिक गॅस उपलब्ध झालेला नसल्याचे सांगितले. शासनाच्या सूचनेनुसार घरगुती ग्राहक, रुग्णालये व शैक्षणिक संस्थांना प्राधान्याने गॅस पुरवठा केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या संदर्भात तालुका पुरवठा अधिकारी गोपाळ ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता, आखाती युद्धामुळे गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झाली असून शासनाच्या आदेशानुसार हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था आणि अत्यावश्यक सेवांना प्रथम प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. हॉटेल असोसिएशनच्या समस्या वरिष्ठांपर्यंत मांडल्या जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जेजुरीत व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याची शंकादेखील काही व्यावसायिकांनी व्यक्त केली. या पत्रकार परिषदेला विजय झगडे, आप्पा बयास, पंकज राहटेकर, अक्षय दरेकर, गणेश गाढवे, अभिजित कुदळे, धनंजय गोडसे, मल्लू कोळी, योगेश भापकर, अविनाश हरपळे, शब्बीर तांबोळी यांच्यासह शंभराहून अधिक हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रFuel Crisisइंधन टंचाईFuel Hikeइंधन दरवाढ