शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

MHADA: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्या 'म्हाडा'च्या 4 हजार 222 घरांसाठी सोडत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 18:38 IST

पुणे म्हाडाच्या साडेचार हजार घरांची लाॅटरी ऑनलाईन काढण्यात येणार आहे

पुणे : पुणेम्हाडाच्या वतीने तब्बल 4 हजार 222 घरांसाठी सोडत जाहीर केली असून, यासाठी तब्बल 65 हजार 180 लोकांनी अर्ज केले आहेत. यापैकी नक्की कोणाला घरांची लाॅटरी लागणार हे शुक्रवार (दि.7) रोजी स्पष्ट होणारा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या घरांच्या सोडतीचा जाहीर कार्यक्रम रद्द केला असून,  उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री अजित पवार मुंबईत मंत्रालयातून आपल्या कार्यालयातून ऑनलाईन पध्दतीनेच ही सोडत जाहीर करणार असल्याची माहिती पुणे म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने-पाटील यांनी दिली.

गेल्या काही दिवसांत पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. यामुळेच शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले आहेत. यामुळेच पुणे म्हाडाच्या साडेचार हजार घरांची लाॅटरी ऑनलाईन काढण्यात येणार आहे.

कोरोनाच्या संकटात समाजातील गरीब व सर्वसामान्य कुटुंबाचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाच्या वतीने दीड वर्षांत हजारो घरांची तीन वेळा सोडत जाहीर करत नवीन विक्रम केला. म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी पुढाकार घेऊन खाजगी व मोठ्या बांधकाम व्यावसायिकांकडून 20 टक्क्यांतील फ्लॅट उपलब्ध करून घेतले. यामुळे शहरातील नामांकित व मोठ्या बिल्डरांच्या प्रकल्पांमध्ये देखील सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील लोकांना घरे मिळू लागली आहेत.

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) पुणे अंतर्गत ८ वी ऑनलाईन सोडत असून, म्हाडाच्या विविध योजनतील २८२३ सदनिका व २०% सर्वसमावेशक योजनअंतर्गत १३९९ सदनिका असे एकूण ४२२२ नवीन सदनिकांच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदनीचा शुभारंभाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. सदर सोडतीमधील ४२२२ सदनिकांसाठी आतापर्यंत 65 हजार 180  इतके विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत. म्हाडा'च्या सोडतीकडे लोकांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत घराची लाॅटरी लागलेल्या लोकांना अधिकृत एसएमएस पाठवून माहिती देण्यात येणार आहे.

टॅग्स :Puneपुणेmhadaम्हाडाMaharashtraमहाराष्ट्रHomeसुंदर गृहनियोजन