शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

पुण्यात म्हाडाच्या साडे तीन हजार घरांसाठी लवकरच सोडत 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 12:17 PM

लाभार्थ्यांना शासनाच्या स्टॅम्प ड्युटी माफीचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न 

ठळक मुद्देयेत्या काही दिवसांत पुण्यात साडे तीन हजार घरांची सोडत करण्यात येणार

पुणे :  पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाच्या ( म्हाडा)  वतीने पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल साडे तीन हजार घरांसाठी लवकरच सोडत जाहिर करण्यात येणार आहे. राज्य शासनाने डिसेंबर 2020 अखेर पर्यंत स्टॅम्प ड्युटी मध्ये सवलत जाहिर केली असून, म्हाडाच्या लाभार्थ्यांना या सवलतीचा लाभ मिळावा यासाठी तातडीने सोडत जाहीर करण्यात येणार असल्याचे पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने पाटील यांनी सांगितले. राज्यासह पुणे जिल्ह्यात कोरोना महामारी आणि लाॅकडाऊन मुळे गेली तीन-चार महिने बहुतेक सरकारी कार्यालये देखील केवळ नावालाच सुरू होती. यामध्ये अनेक सरकारी कार्यालयाचे कामकाज तर ठप्पच होते.पण आता ऑनलाॅक मध्ये बहुतेक सर्व व्यवहार सुरुळती होत असून , शासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहेत. याबाबत माने यांनी सांगितले,पुण्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात म्हाडाच्या घरांसाठी जाहिरात काढण्यात येणार आहे. खासगी विकासकाकडून म्हाडाला २० टक्के जी घरे मिळाली आहेत. त्या घरांची किंमत निश्चित करण्याचे काम सुरू आहे. तसेच म्हाडाच्या स्वत : च्या जागेवर देखील मोठ्या प्रमाणात या वेळी घरे बांधण्यात येणार आहे. त्यामुळे काम पूर्ण होताच ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.  याबाबत माने पाटील यांनी सांगितले की,  कोरोना महामारीमुळे लोकांची आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाला आहे. यामुळेच म्हाडाच्या वतीने लोकांना परवडणाऱ्या किंमतीत घरे उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यात लाभार्थांना स्टॅम्प ड्युटीचा लाभ मिळाल्यास आणखी एक दीड लाख रुपयांचा फायदा होऊ शकतोय. यासाठी येत्या काही दिवसांत पुण्यात साडे तीन हजार घरांची सोडत करण्यात येणार आहे.

टॅग्स :Puneपुणेmhadaम्हाडाState Governmentराज्य सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या