शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला कार शिकवताना सुटला ताबा; कारसह पती - पत्नी विहिरीत, पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 15:19 IST

शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील केंदूर रस्त्याने पती कार घेऊन पत्नीला शिकविण्यासाठी गेला होता

केंदूर : शिरूर तालुक्यातील करंदी येथे आज पहाटेच्या सुमारास एक खळबळजनक घटना घडली आहे. पती आपल्या पत्नीला कार शिकवत असताना पत्नीचा ताबा सुटल्याने कार विहिरीत पडून पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वर्षा दिपक आदक (वय ३० वर्षे रा. शेखर हाईटस सोसायटी,  ता. शिरुर) असे या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी दिपक प्रभाकर आदक (वय ३६ वर्षे रा. शेखर हाईटस सोसायटी ता. शिरुर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.  

शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील केंदूर रस्त्याने दिपक आदक हा कार घेऊन पत्नी वर्षा हिला कार शिकविण्यासाठी गेला होता. करंदी गावातील पऱ्हाडवाडी रोडने पत्नी वर्षा हिला दिपक कार शिकवत असताना समोरून अचानक दुचाकी आली. यावेळी दिपक याने वर्षा हिला कारचा ब्रेक दाबल्याचा सांगितल्यावर चुकून वर्षाने कारच्या एक्सलेटरवर पाय दिला. त्यावेळी कारचा ताबा सुटल्याने कार शेजारील विहिरीमध्ये कोसळली. दिपकने तातडीने वर्षाच्या बाजूच्या काचेतून तिला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र वर्षाला बाहेर निघता आले नाही. त्यामुळे दिपकने स्वतः बाहेर बाहेर निघून पत्नीला देखील ओढून बाहेर काढले. आणि विहिरीतील पाईपला पकडून मोठमोठ्याने आरडाओरडा केला. शेजारी रस्त्याने जाणारे काही नागरिक या ठिकाणी धावून आले. त्यांनी दिपक आदक व वर्षा आदक या दोघांना बाहेर काढले, मात्र विहिरीतून बाहेर काढल्यानंतर वर्षा हिची कसलीही हालचाल होत नव्हती. या घटनेमध्ये वर्षा दिपक आदक या महिलेचा जागीच मृत्यु झाला आहे. 

घटनेची माहिती मिळताच करंदीच्या पोलीस पाटील वंदना साबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल ढेकणे, पोलीस हवालदार संदीप कारंडे, पोलीस नाईक विकास पाटील, राहुल वाघमोडे यांनी घटना स्थळी धाव घेत पाहणी केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप कारंडे व विकास पाटील हे करत आहे.

टॅग्स :ShirurशिरुरAccidentअपघातPoliceपोलिसcarकारDeathमृत्यू