शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

पीएमपीचा तोटा कमी झाला होता; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 01:49 IST

सक्षम अधिकारी ठरले तारणहार : तरी यंदाच्या वर्षी २०४.६२ कोटींचा तोटा

पुणे : सातत्याने तोट्यात जाणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) सक्षम अधिकारी नफ्यात आणू शकतात, हे मागील काही वर्षांच्या आर्थिक ताळेबंदावरून स्पष्ट झाले आहे. मागील ८ वर्षांत केवळ डॉ. श्रीकर परदेशी व तुकाराम मुंढे यांनी केलेल्या सुधारणांमुळे तोटा घटल्याचे दिसते. विशेष म्हणजे, दोन्ही अधिकाºयांना कमी कालावधी मिळाला होता. मागील वर्षी खर्च वाढूनही पीएमपीचा तोटा सुमारे ६ कोटींनी कमी झाला आहे.

पीएमपीचा आर्थिक वर्ष २०१७-१८चा आर्थिक ताळेबंद गुरुवारी संचालक मंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला. त्यानंतर संचालक व नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. मागील वर्षी पीएमपीला एकूण ६५८ कोटी ५१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. मात्र, ८६३ कोटी १४ लाख रुपयांचा खर्च झाल्याने एकूण तोटा सुमारे २०४ कोटी रुपयांवर गेला. आर्थिक वर्ष २०१६-१७ पेक्षा हा तोटा ५.८२ कोटींनी कमी झाला आहे. तर, मागील वर्षीच्या खर्चात १४.६६ कोटी रुपयांत वाढ झाली आहे. डॉ. परदेशी यांच्याकडे १२ डिसेंबर २०१४मध्ये पीएमपीचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला. त्यांना केवळ चार महिन्यांचा कालावधी मिळाला; पण त्यादरम्यान त्यांनीही पीएमपीची स्थिती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. दररोजच्या उत्पन्नातील ६ टक्के रक्कम केवळ बसच्या देखभाल-दुरुस्तीसाठी देण्याचा त्यांचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरला. मार्गांचे सुसूत्रीकरण, बसवाढीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला. या कामाचा प्रत्यक्ष फायदा आर्थिक वर्ष २०१५-१६मध्ये झाला. आर्थिक वर्ष २०१४-१५मध्ये पीएमपीची तूट १६७.६८ कोटी रुपये होती. पुढील वर्षात ही तूट १५१.८० कोटींपर्यंत खाली आली. मात्र, १६-१७मध्ये पुन्हा हा तोटा सुमारे २१० कोटींवर गेला.

मुंढे यांनी मागील वर्षी मार्च महिन्यात पीएमपीचा पदभार स्वीकारला. त्यांनी पहिल्या दिवसापासूनच कामात शिस्त आणण्यापासून खर्चात कपात करण्याचे धोरण अवलंबिले. तसेच मार्ग, पासचे सुसूत्रीकरण, ठेकेदारांवर मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई, मार्गांवरील बसमध्ये वाढ, ब्रेकडाऊन कमी करण्याकडे प्राधान्याने लक्ष दिले. ठेकेदारांपेक्षा पीएमपीच्या मालकीच्या बस अधिक प्रमाणात मार्गावर आणल्या. या बदलांमुळे पीएमपीचे उत्पन्न २०.४८ कोटींनी वाढले. दोन्ही अधिकाºयांनी केलेल्या बदलांमुळे तोटा घटल्याचे अधिकाºयांनीही मान्य केले. त्यामुळे परदेशी, मुंढे यांच्यासारखे पूर्णवेळ अधिकारी मिळाल्यास पीएमपीला ‘अच्छे दिन’ येतील, हे अधोरेखित होते.‘पीएमपी’चा आर्थिक ताळेबंद(आकडे कोटींत)घटक २०१६-१७ २०१७-१८ फरकएकूण उत्पन्न ६३८.०३ ६५८.५२ २०.८५ वाढएकूण खर्च ८४८.४७ ८६३.१४ १४.६६ वाढएकूण तोटा २१०.४४ २०४.६२ ५.८२ घटतिकीट उत्पन्न ३८२.५० ४०८.८१ २५.६५ वाढइंधन खर्च ९०.९० ११६.५६ २५.६५ वाढठेकेदारांना दंड २१.०६ ३७.२१ १६.१५ वाढदेखभाल खर्च २७.५८ ३७.४५ ९.८७ वाढपास उत्पन्न ११५.०४ १०४.८७ १०.१७ घटबसभाडे १२.९६ १०.३७ २.५९ घटपास अनुदान ७३.५८ ६५.१५ ८.४३ घटपुढील काळातही पीएमपीचा तोटा कमी करण्यासाठी विविध प्रयत्न केले जातील. ब्रेकडाऊन कमी करणे, तिकीट विक्री वाढविण्यासाठी प्रयत्न, तोट्यातील मार्ग कमी करणे, मार्गांचे सुसूत्रीकरण अशा सर्व बाबींचा बृहत् आराखडा तयार करण्याचा विचार आहे. - सिद्धार्थ शिरोळे,नगरसेवक व पीएमपी संचालकअसे मिळाले उत्पन्नतिकीट व पासविक्री - ६७.२५ टक्केजाहिरात - १.१९ टक्केदंड - ४.२८ टक्केसंचालन तूट २५ टक्केअसा झाला खर्चवेतन व इतर प्रशासकीय - ५१ टक्केइंधन - १३.५ टक्केबसभाडे - २५.५ टक्केदेखभाल-दुरुस्ती - ४.५ टक्केसुरक्षा - १ टक्केई-टिकेटिंग - १.१ टक्केइतर - ३.७ टक्केठळक वैशिष्ट्ये४एकूण तोटा ५.८२ कोटींनी घटला४उत्पन्न २०.४८ कोटींनी वाढले४प्रतिकिलोमीटर ३७ पैसे वाढ४एकूण खर्चात १४.६६ कोटींची वाढ४प्रशासकीय खर्चात २८ कोटींची वाढ४तिकीटविक्रीत २५.६६ कोटींची वाढ४पास विक्रीत १०.१८ कोटींची घट४लक्झरी सेवा उत्पन्न ८ लाखांनी वाढले४मार्गांवरील बसमध्ये वाढ४प्रवासी १० हजारांनी वाढले

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलPuneपुणे