शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी, बस घटल्याने '' पीमपी '' चा तोटा २४४ कोटींवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 12:25 IST

प्रवासी संख्येत सुमारे ५५ हजारांनी घट झाली असून वर्षभरातील बसची धाव तब्बल ८५ लाख किलोमीटरने कमी झाली आहे.

ठळक मुद्दे इंधन दरवाढीचाही फटका, बससंख्या कमी‘पीएमपी’ची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय होत चालली असल्याचे वाढलेल्या तोट्यावरून स्पष्ट

राजानंद मोरेपुणे : मागील वर्षभरात प्रवासी संख्या वाढविणे, ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी करणे, अधिकाधिक बस मार्गावर आणण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) केलेले प्रयत्न फोल ठरले आहेत. मागील आर्थिक वर्षात पीएमपीने आतापर्यंतच्या तोट्याचा उच्चांक गाठला आहे. ‘पीएमपी’ची २०१८-१९ या वर्षातील संचलन तुट म्हणजे आर्थिक तोटा २०४ कोटी रुपयांवरून २४४ कोटींवर पोहचला आहे. प्रवासी संख्येत सुमारे ५५ हजारांनी घट झाली असून वर्षभरातील बसची धाव तब्बल ८५ लाख किलोमीटरने कमी झाली आहे. त्याचबरोबर इंधन दरवाढीनेही पीएमपीचे कंबरडे मोडल्याचे स्पष्ट झाले आहे.‘पीएमपी’ची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय होत चालली असल्याचे वाढलेल्या तोट्यावरून स्पष्ट झाले आहे. आर्थिक वर्ष २०१२-१३ पासूनची स्थिती पाहिल्यास तोट्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. २०१७-१८ हे वर्ष त्याला अपवाद ठरले आहे. या वर्षी पीएमपीचा तोटा ६ कोटींनी कमी झाला होता. तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी ठेकेदारांवर केलेली कारवाई, मार्गावर वाढलेल्या बस, वाढलेले प्रवासी तसेच बसची वाढलेली धावही त्यास कारणीभुत होती. याउलट २०१८-१९ मध्ये सर्वच आघाड्यांवर पीएमपीची पीछेहाट झाली आहे. आर्थिक २०१७-१८ मध्ये दररोज सरासरी १४२५ बस मार्गावर होत्या. मागील वर्षी हा आकडा १३७३ पर्यंत खाली आला आहे. प्रशासनला प्रवासी संख्या वाढविण्यातही अपयश आले आहे. मागील वर्षी सुमारे १० लाख ३४ हजार प्रवाशांना दररोज प्रवास केला. २०१७-१८ व २०१६-१७ च्या तुलनेत ही संख्या अनुक्रमे ५५ हजार व ६५ हजारांनी कमी आहे. मार्गावरील बससंख्या घटल्याने तसेच ब्रेकडाऊन कमी न झाल्याने दैनंदिन किलोमीटर सुमारे ८५ लाखांनी कमी झाले आहे. २०१८-१९ मध्ये सर्व बस सुमारे १० कोटी ३६ लाख किलोमीटर धावल्या. त्यानुसार एक बस दररोज सुमारे २०६ किलोमीटर धावली. तर २०१७-१८ मध्ये ही धाव सुमारे २१५ किलोमीटर एवढी होती. प्रामुख्याने भाडेतत्वावरील बसची धाव कमी झाल्याचे पीएमपीतील सुत्रांनी सांगितले. परिणामी, प्रवासी संख्येवर त्याचा परिणाम होऊन तिकीट विक्रीतून मिळणारे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर कमी झाले.  -------------------पीएमपीच्या ताफ्यात मागील वर्षभरात २५ इलेक्ट्रिक, ३३ तेजस्विनी आणि २०० हून अधिक मिडी बस दाखल झाल्या. पण त्यानंतर प्रत्यक्ष मार्गावरील बसची संख्या वाढली आहे. २०१७-१८ मध्ये पीएमपीच्या मालकीच्या ७९४ बस मार्गावर होत्या. त्यामध्ये मागील वर्षी केवळ ३ ने वाढ झाली आहे. नवीन बस आल्यामुळे अनेक जुन्या बस ताफ्यातून बाहेर काढण्यात आल्या. तर भाडेतत्वावरील ५६ बस कमी झाल्या. २०१७-१८ मध्ये ६३१ बस मार्गावर होत्या. पण देखभाल-दुरूस्ती अभावी अनेक बस मार्गावर येत नसल्याने हे प्रमाण कमी झाले आहे.

इंधन दरवाढीने ३३ कोटींचा बोजामागील वर्षभरात इंधनदरवाढीनेही पीएमपीचे कंबरडे मोडले. वर्षात सीएनजी व डिझेलच्या दरात सरासरी प्रत्येकी ८ रुपयाने वाढ झाली. एकाच वर्षात पहिल्यांदाच एवढी वाढ झाली आहे. त्यामुळे इंधन खर्च वाढून सुमारे १५० कोटींवर पोहचला. २०१७-१८ च्या तुलनेत या खर्चात ३३ कोटींची वाढ झाली. २०१७-१८ मध्ये सीएनजी व डिझेलचे दर अनुक्रमे ४६ रुपये प्रति किलो व ६३ रुपये प्रति लिटर एवढे होते.तुकाराम मुंढे यांनी ठेकेदारांवर मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई केली होती. त्यामुळे त्यांना द्याव्या लागणाºया बिलामध्ये कपात करण्यात आली होती. परिणामी २०१७-१८ मध्ये तोटा कमी झाल्याचे दिसते. ही कारवाई मागील वर्षभरात काही प्रमाणात कमी झाली असली तरी ठेकेदारांकडील मार्गावरील बसही कमी होत्या. त्यामुळे त्यांचे बील कमी झाले. त्यामुळे काही प्रमाणात तोटा भरून निघाला. अन्यथा एकुण २४४ कोटी रुपयांच्या तोट्यात आणखी काही कोटींची भर पडली असती, असे सुत्रांनी सांगितले.

मागील तीन वर्षातील पीएमपीची स्थिती                                        २०१६-१७                      २०१७-१८          २०१८-१९प्रवासी संख्या                   १०,७९,२२३                 १०,८९,२०८         १०,३४,००००बसची धाव (किलोमीटर)  १०,९३,३०,१९७           ११,२१,३०,१७९    १०,३६,०००००मार्गावरील बस                  १३८३                          १४२५                   १३७३---------------------------------------------------------------------आर्थिक वर्ष २०१२-२०१८ मधील जमा खर्चवर्ष                 प्राप्त उत्पन्न               खर्च                        तोटा२०१२-१३    ५३२,६१,९७,६६७        ५९५,२३,५०,२८९        ६२,६१,५२,६२२२०१३-१४    ६०२,६२,५३,२८०        ७०२,०३,२८,८७९        ९९,४०,७५,५९९२०१४-१५    ७०७,३७,९३,७३३        ८७५,०६,५९,३८४        १६७,६८,६५,६५१२०१५-१६    ७७६,७५,२४,४१२        ९२८,५५,७८,७८४        १५१,८०,५४,३७२२०१६-१७    ७२०९३०५६८०        ९३१३७५१०४८        २१०,४४,४५,३६८२०१७-१८    ६५८५१८०९७३        ८६३१३९५६०१        २०४,६२,१४,६२८२०१८-१९    --            --            २४४,००,००,००० (सुमारे)-------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडेtukaram mundheतुकाराम मुंढे