शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

चाकू हल्ला करत स्टेशन मास्तरला लुटले

By admin | Updated: June 7, 2014 00:28 IST

लोणावळा रेल्वे स्थानकाहून सुटणार्‍या लोकलमध्ये रेल्वे स्टेशन मास्तर नारायण जी़ शेळके यांच्यावर चार अज्ञात युवकांनी चाकू हल्ला केला.

लोणावळा : रात्री १०़०५ मिनिटांनी लोणावळा रेल्वे स्थानकाहून सुटणार्‍या लोकलमध्ये रेल्वे स्टेशन मास्तर नारायण जी़ शेळके यांच्यावर चार अज्ञात युवकांनी चाकू हल्ला केला. त्यांच्याकडील रोकड व एक मोबाईल फ ोन घेऊन मळवली रेल्वे स्थानकावर पोबारा केला़ या घटनेमध्ये शेळके यांच्या गळ्याला मार लागला असून, लोणावळ्यातील एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़ चोरट्यांनी त्यांचा गळा चिरण्याचा प्रयत्न केल्याने मोठी जखम झाली असून १४ टाके घालण्यात आले आहेत. दरम्यान, शेळके यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले़ मुंबईहून महालक्ष्मी एक्सप्रेसने आलेले स्टेशन मास्तर शेळके गुरुवारी रात्री लोणावळ्यात उतरले व पुण्याला जाणार्‍या १०़०५ च्या लोकलमध्ये फ र्स्ट क्लास डब्ब्यात बसले होते़ गाडी स्टेशनवरून सुटल्याने मागून पळत येऊन चार तरुणांनी गाडीत प्रवेश केला. गाडी थोडी पुढे गेल्यानंतर या चोरट्यांनी शेळके यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील सर्व रोकड काढून घेतली; तसेच त्यांचा मोबाईल हिसकावून घेत फे कून दिला़ प्रतिकार करायला गेलेल्या शेळके यांच्या गळ्यावर त्यांनी चाकूचा हल्ला करत गळा चिरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मळवली स्थानक आल्याने ते चौघेही उतरुन पसार झाले़ ते २० ते २२ वयोगटांतील आहेत़ हल्ल्याचा उद्देश काय?लोणावळा रेल्वे स्थानकावरील गर्दुले व पाकिटमार यांचा सुळसुळाट मागील काही काळापासून सुरू आहे़ यापूर्वी स्थानकावर वाढलेला बकालपणा, गर्दुल्यांचा वाढता वावर आदींवर नियंत्रण ठेवण्यासाठी शेळके यांनी रेल्वे पोलिसांना सूचना देऊन त्यांच्यावर कारवाई करा, असे बजावले होते़ हल्ला हा त्यांना लुटण्यासाठी होता की जाणीवपूर्वक पाळत ठेवून त्यांच्यावर हल्ला केला गेला, याबाबत रेल्वे पोलीस तपास करत आहेत़ दरम्यान, ही घटना घडल्यानंतर स्थानक व परिसरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी तातडीने काय उपाययोजना करता येतील, याकरिता रेल्वेच्या जीआरपीएफ पोलिसांची आज सकाळी तातडीची बैठक झाली़