शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुणे रेल्वे स्टेशनवर पोलिसांकडूनच 'लाखोंची लुटमार'; सहा पोलिसांचे तडकाफडकी निलंबन

By नितीश गोवंडे | Updated: April 6, 2023 16:59 IST

गैरप्रकार करणाऱ्या लोहमार्ग पोलिसांच्या सहा कर्मचाऱ्यांना एकाचवेळी तडकाफडकी खात्यातून निलंबीत करण्यात आले...

पुणे :रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा तपासणीच्या नावाखाली गैरप्रकार करणाऱ्या लोहमार्ग पोलिसांच्या सहा कर्मचाऱ्यांना एकाचवेळी तडकाफडकी खात्यातून निलंबीत करण्यात आले आहे. सहायक फौजदार बाळू पाटोळे, पोलिस हवालदार सुनिल व्हटकर, प्रशांत डोईफोडे, जयंत रणदिवे, विशाल गोसावी, अमोल सोनावणे (सर्वांची नेमणूक लोहमार्ग पोलिस ठाणे, पुणेरेल्वे स्टेशन) अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. याबातचे आदेश लोहमार्ग पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे यांनी दिले.

दरम्यान जून २०२१ मध्ये लोहमार्ग पोलिस ठाण्यातील तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह आठ जणांना निलंबित करण्यात होते. त्यातील सात जणांना खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. अंमली पदार्थ प्रकरणी केलेल्या कारवाईनंतर तपासात अनियमितता केल्याचा ठपका ठेवत लोहमार्ग पोलिसांच्या अपर पोलिस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांनी सर्वांना निलंबीत केले होते. अंमली पदार्थाचा तपास एटीएसने आपल्याकडे घेतल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला होता.

निलंबित करण्यात आलेल्या सहा जणांना ३ एप्रिल रोजी बॅग तपासणीचे कर्तव्य देण्यात आले होते. दुपारी पावणे एकच्या सुमारास त्यांनी एका तरुण-तरुणीला संशयावरून थांबवले. त्यांनी असमाधानकारक उत्तर दिल्याने त्यांना पोलिस निरीक्षकांच्या समोर हजर केले. त्यानंतर दोघांना संध्याकाळी साडेसातच्या सुमारास सोडून दिले. तशी नोंद ठाण्यातील दैनंदिनीत घेतली. दोघांना या कर्मचाऱ्यांनी गांजा बाळगल्याच्या संशयावरून अडवले होते. त्यानंतर त्यांच्याकडून पाच लाख रुपये घेऊन त्यांना सोडून दिले. असे पोलिस महासंचालक कार्यालय लोहमार्ग मुंबई यांच्याकडून लोहमार्ग अधीक्षकांना कळवण्यात आले.

याबाबत अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत आरपीएफकडून कोयना एक्स्प्रेस रेल्वे फलाटावर येण्याच्या तसेच आजू-बाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये अनेक संशयास्पद बाबी आढळून आल्या. निलंबित सहा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कर्तव्यात गंभीर कसूर केल्याचे प्रथमदर्शी दिसून आले आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना पोलिस निरीक्षक इरफान शेख यांना देण्यात आल्या आहेत. या सहा पोलिस कर्मचार्यांनी शासकीय कार्यालयात कर्तव्यावर असताना बेशीस्त, बेजबाबदार वर्तन करून शिस्तप्रिय पोलिस खात्याची प्रतिमा मलीन होईल असे वर्तन केल्याचा ठपका ठेवत त्यांना खात्यातून निलंबीत करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.

यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर जबरी चोरीचा गुन्हा...या सहा कर्मचार्यांपैकी काही कर्मचारी आलटून-पालटून बदली करून घेत गेल्या २० वर्षांपासून येथेच नोकरी करत आहेत. त्यांच्या कर्तव्याचा जास्तीत जास्त कार्यकाळ हा लोहमार्ग पोलिस ठाण्यातीलच आहे. सहायक फौजदार बाळू पाटोळे आणि हवालदार सुनील व्हटकर या दोन कर्मचाऱ्यांवर बॅग तपासणी दरम्यान चोरी केल्याप्रकरणी एक जबरी चोरीचा गुन्हा देखील दाखल आहे. असे असताना देखील त्यांना पुन्हा बॅग तपासणीचीच जबाबदारी देण्यात आल्याने ही गंभीर बाब आहे.

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिसPuneपुणे