बीआरटीचे ढिसाळ नियोजन

By Admin | Updated: November 11, 2014 00:19 IST2014-11-11T00:19:25+5:302014-11-11T00:19:25+5:30

देशातील पहिला बस रॅपिड टॉन्ङिाट सिस्टीम (बीआरटी) हा पथदर्शी प्रकल्प म्हणून गाजावाजा झालेला प्रकल्प आज अस्तित्वातच नसल्याचे चित्र आहे.

Loose planning of BRT | बीआरटीचे ढिसाळ नियोजन

बीआरटीचे ढिसाळ नियोजन

पुणो : देशातील पहिला बस रॅपिड टॉन्ङिाट सिस्टीम (बीआरटी) हा पथदर्शी प्रकल्प म्हणून गाजावाजा झालेला प्रकल्प आज अस्तित्वातच नसल्याचे चित्र आहे. अर्धवट केलेले नियोजन, चांगल्या योजनेची सोयीनुसार केलेली अंमलबजावणी, जनजागृतीचा अभाव आणि त्यामुळे वाढलेले अपघात आणि राजकीय सोयीसाठी झालेला विरोध यांमुळे कात्रज ते हडपसर हा 16 किलोमीटरचा बीआरटी मार्ग आज जवळपास शिल्लकच राहिलेला नाही़ या मार्गावर तब्बल 35 अपघात झाले. 
कात्रज, स्वारगेट, हडपसर या 16 किलोमीटर मार्गावर देशातील पहिल्या बीआरटी प्रकल्पाची घोषणा त्या वेळी पुणो महापालिकेचे सर्वेसर्वा असलेले तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांनी केली. त्यासाठी केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजना (जेएनएनयूआरएम)मार्फत निधी मिळविला होता़ डिसेंबर 2क्क्6मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली तेव्हा मोठा गाजावाजा झाला होता़ ‘प्रवाशांना दर काही मिनिटांनी बस, वाटेत कोणताही अडथळा नाही़, वेगाने प्रवास’ अशी मोठी जाहिरात या प्रकल्पाची करण्यात आली़ महापालिका निवडणुकीपूर्वी त्याची घाईघाईने अंमलबजावणी सुरू करून उद्घाटनही करण्यात आल़े पण, हा प्रकल्प राबवत असताना त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. प्रवाशांना रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग बांधण्यात आले नाही़त प्रवाशांना माहितीसाठी कोणतीही सुविधा पुरविण्यात आली नाही़ बीआरटी टर्मिनलजवळ वाहनतळ विकसित केले नाही़ बीआरटीबाबत आवश्यक जनजागृती करण्यात आली नाही़ त्यामुळे लोकांनी वैयक्तिक वाहन न वापरता बस वापर वाढला नाही़ परिणामी, कात्रज ते हडपसर मार्गावर वैयक्तिक वाहनांसाठी अपुरा रस्ता उपलब्ध झाल्याने वाहतूककोंडीत वाढ झाली़ त्यातून खासगी वाहने बीआरटीचा मार्ग वापरू लागली़ 
रस्ता ओलांडण्याची पुरेशी सोय नसल्याने कोठूनही रस्ता ओलांडताना अपघातांची संख्या वाढली़ या 
सर्वाचा परिणाम होऊन बीआरटी बदनाम झाली़ 
योग्य नियोजन न करता घिसाडघाईने बीआरटी सुरू केल्याने या योजनेतील दोष फक्त पुणोकरांच्या माथी पडल़े त्यातील त्रुटी दूर करण्याची मागणी करून राजकीय कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्षाने बीआरटीला विरोध सुरू केला़ बीआरटी सुरू झाल्यानंतर तीन वर्षानी भाजपने सातारा रोडवर बीआरटी मार्गातून टांगा मोर्चा काढत विरोध केला़
कात्रज ते हडपसर या मार्गावर बीआरटी सुरू झाल्यानंतर जवळपास 35 हून अधिक अपघात झाल़े त्यात प्रामुख्याने पीएमपी बसचा समावेश होता़ अपघात झालेल्या बसला नागरिकांनी लक्ष्य करीत दगडफेक करून तिची मोडतोड करण्याच्या घटनाही घडल्या़ बीआरटीत खासगी वाहने शिरू नयेत म्हणून या मार्गावर प्रत्येक चौकात ट्रॉफिक वॉर्डन ठेवण्यात आल़े 
वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला; पण खासगी वाहनांसाठी असलेला रस्ता वाहनांनी भरलेला आणि बीआरटी रस्ता मोकळा असे चित्र दिसत असल्याने वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नांनाही यश 
आले नाही़  (प्रतिनिधी)
 
केंद्र शासनाच्या निकषानुसार बीआरटी मार्गावर आयटीएमएस यंत्रणा बसविणो आवश्यक आहे. पीएमपीने त्यासाठीची निविदा प्रक्रिया राबविली आहे. स्थायी समितीपुढे त्यासाठी 12 कोटींच्या निधी मंजुरीचा प्रस्ताव येणार आहे. परंतु, शहराच्या विकास प्रकल्पात कोणत्याही राजकीय पक्षाने राजकारण आणू नये.
- दत्तात्रय धनकवडे, महापौर 

 

Web Title: Loose planning of BRT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.