पुणे व पिंपरी शहरात मद्यप्रेमींच्या दारूच्या दुकानासमोर लांबच लांब रांगा; लॉकडाऊनच्या पालनाकडे दुर्लक्षपिंपरी : राज्य सरकारने ३ मे नंतर लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला असला तरी दारूची दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे पुणे तसेच पिंपरी शहरातील दारूच्या दुकानांबाहेर सोमवारी सकाळी नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. दारूसाठी शहरात गर्दीचा महापूर आल्याचे चित्र होते.संपूर्ण पुणे जिल्हा रेडझोन मध्ये आहे. तसेच शहरात व पिंपरी-चिंचवड येथे दिवसागणिक कोरोनाग्रस्त रुग्ण वेगाने वाढत आहे. आढळत आहेत. तर शहरातील काही भागात जरी प्रशासनाने नियमांत शिथिलता आणली असली तरी प्रतिबंधित क्षेत्र (कन्टेंमेंन्ट झोन) देखील मोठ्या प्रमाणात असल्याचे समोर आले आहे. जीवनावश्यक वस्तू, औषधे यांच्यासोबतच किराणा दुकान व भाजीपाला व फळे विकायला देखील निर्बंध घालण्यात आले आहेत.
काही ठिकाणी दुकानेच ऊन उघडल्यामुळे मद्यप्रेमींच्या पदरी निराशा
पुण्यासह दक्षिण उपनगरांमधील मद्यविक्री करणाऱ्या दुकानांसमोर सोमवारी सकाळी सकाळीच मद्यप्रेमींनी गर्दी केली होती. गेली चाळीस दिवस मद्य्याविना घशाला कोरड पडलेल्या मद्यप्रेमींनी सोमवारी सकाळीच दुकान गाठले. मात्र दहा वाजलेतरी दुकाने काही उघडली नाहीत आणि मद्यप्रेमींचा घसा ओला झाला नाही. त्यामुळे नाराज मद्यप्रेमी निराश होऊन घशा ओला न करताच माघारी फिरावे लागले.
रविवारी सायंकाळी मद्यविक्री सुरू होणार अशी चर्चा होऊ लागली आणि त्याचे पडसाद सोमवारी सकाळीच सर्वत्र उमटले. दक्षिण उपनगरांमधील विविध वाईन शॉप समोर सकाळी ७ वाजल्यापासून मद्यप्रेमींनी रांगा लावल्या. तब्बल चाळीस दिवसांची प्रतिक्षा सहन केल्यानंतर आज कुठं दिलासा मिळाला होता. परंतु निराशाच झाली अशी प्रतिक्रिया वाईन शॉप उघडण्याची प्रतिक्षा करत असलेल्या मद्यप्रेमींकडून देण्यात आली.
मद्यविक्रीची परवानगी देण्याचे अंतिम अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांचे आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आदेश येत नाही, तोपर्यंत वाईन शॉप सुरु करता येणार नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतरच पुढील कार्यवाही होणार हे आता स्पष्ट झाले आहे.
.......................................
शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात दारूची दुकाने बंद राहणार आहेत. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग व शासनाच्या निदेर्शानुसार दारूची दुकाने सुरू होतील.- संदीप बिष्णोई, पोलीस आयुक्त, पिंपरी - चिंचवड