पुणे : दिवाळीनंतरही उत्तरेकडील राज्यांत जाणाºया लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण नोव्हेंबर अखेरपर्यंत फुल्ल आहे. छटपुजेसाठी या राज्यांमध्ये गेलेले नागरिक पुढील काही दिवसांत परतणार असल्याने डिसेंबर मध्यापर्यंत परतीच्या गाड्यांनाही गर्दी असेल. तर राज्यांतर्गत गाड्यांचे आरक्षण मात्र सहजपणे उपलब्ध होत आहे.
रेल्वेकडून प्रवासी वाहतुक सुरू करण्यात आली असली तरी अद्याप काही ठराविक गाड्यांनाच हिरवा कंदील मिळालेला आहे. पुणे स्थानकातून सध्या केवळ दहा मार्गांवरच थेट रेल्वेगाड्या सुरू आहेत. त्यापैकी पाच गाड्या महाराष्ट्रातच धावतात. तर उर्वरीत पाच गाड्यांपैकी दोन दिल्ली आणि दानापुर, हावडा या मार्गांवर प्रत्येकी एक गाडी आहे. तर इंदौर गाडी तीन दिवस धावते. डेक्कन क्वीन, इंद्रायणी व दानापुर एक्सप्रेस या गाड्या दररोज धावत आहेत. अमरावती व नागपुर या गाड्या आठवड्यातून एकदा व अजनी गाडी दोन दिवस धावते. हावडा आणि निझामुद्दीन दुरांतो या गाड्या प्रत्येकी दोन दिवस आणि निझामुद्दीन वातानुकूलित आणि इंदौर गाडी साप्ताहिक आहे. दिवाळी व छटपुजेच्या पार्श्वभुमीवर रेल्वेने या गाड्यांव्यतिरिक्त उत्सव विशेष गाड्या सोडण्यास सुरूवात केली. त्यामध्ये निझामुद्दीन, जबलपुर, जयपुर, दरभंगा, गोरखपुर आदी गाड्यांचा समावेश आहे. दिवाळीपुर्वी सर्व उत्सव विशेष गाड्यांचे आरक्षण फुल्ल होते. दिवाळीनंतरचे आरक्षणही त्यावेळी फुल्ल झाले होते. बहुतेक गाड्यांना नोव्हेंबर अखेरपर्यंत प्रतिक्षा यादी असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. यातील बहुतेक गाड्या नोव्हेंबरअखेरपर्यंतच धावणार आहेत.
------------
मुंबई, नागपुर, अमरावती गाड्या रिकाम्या
महाराष्ट्रात धावणाºया गाडंना सहज आरक्षण मिळत आहे. डेक्कन क्वीन व इंद्रायणी एक्सप्रेस या मुंबई गाड्या, नागपुर आणि अमरावती या विदर्भात जाणाºया गाड्यांना ५० टक्केही प्रतिसाद नाही. अजनी एक्सप्रेसचे आरक्षणही सहज उपलब्ध होत असले तरी तुलनेने चांगला प्रतिसाद आहे.
-----------
काही गाड्यांच्या आरक्षणाची स्थिती
डेक्कन क्वीन (दि. २१) - ४२.८३ टक्के
हावडा (दि. २१) - ८७.८६ टक्के
गोरखपुर (दि. २१) - १२८.५१ टक्के
अजनी (दि. २१) - ७४.२० टक्के
जयपुर (दि. २२) - १२४.६९
दरभंगा (दि. २५) - १३०.१९
नागपुर (दि. २६) - ३५.९०
-----------
दिवाळी व छटपुजेमुळे उत्तरेकडील बहुतेक गाड्यांचे आरक्षण फुल्ल आहे. आता परतीचा प्रवास सुरू होईल. या गाड्यांचे आरक्षणही सध्या फुल्ल आहे. उत्सव गाड्या नोव्हेंबर अखेरपर्यंत धावणार आहेत. या गाड्यांना अद्याप मुदतवाढ मिळालेली नाही.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे
-----------