Lonavala receives 110 mm of rainfall in 24 hours | मुसळधार पावसानं लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हर फ्लो; संततधार कायम 

मुसळधार पावसानं लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हर फ्लो; संततधार कायम 

लोणावळा : लोणावळा खंडाळा परिसरात मागील 24 तासांत 110 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाची संततधार आज देखील कायम आहे. मुंबई परिसरात पावसाने थैमान घातले असताना त्यांचा तडाखा लोणावळा खंडाळा या घाटमाथ्यावरील शहरांना देखील बसला आहे. पावसाचे आगार असलेल्या मावळ तालुक्यात काल शनिवारपासून पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून पावसाची संततधार कायम आहे. पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण देखील भरले असून डोंगर भागातून धबधबे वाहू लागले आहे.

इंद्रायणी नदीच्या पात्रातील पाणी वाढले आहे. लोणावळा बाजारभाग, नांगरगाव, तुंगार्ली, वलवण येथील काही सखल भागात पाणी साचू लागले आहे. पावसाची संततधार थांबत नसल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. कोरोनाच्या संकटकाळात प्रशासनाला पावसाच्या नैसर्गिक आपत्तीचा देखील सामना करावा लागणार आहे. समाधानकारक पावसाला सुरुवात झाल्याने ग्रामीण भागातील शेतकरी आनंदला आहे. भातरोपे मोठी झाली, मात्र भात लावणीकरिता शेतात पाणी नसल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. मागील 24 तासांपासून सुरू असलेला पाऊस मावळात सर्वत्र झाल्याने आता शेतीच्या कामांना जोर मिळणार आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Lonavala receives 110 mm of rainfall in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.