VIDEO - लोकमत 'ती' चा गणपती : मिड नाइट रॅलीत स्त्रीशक्तीचा जयघोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2017 03:02 IST2017-08-25T02:55:30+5:302017-08-25T03:02:29+5:30
पुणे, दि. 25 - 'जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ', 'भारत माता की जय', 'गणपती बाप्पा मोरया' अशा जयघोषात ...

VIDEO - लोकमत 'ती' चा गणपती : मिड नाइट रॅलीत स्त्रीशक्तीचा जयघोष
पुणे, दि. 25 - 'जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ', 'भारत माता की जय', 'गणपती बाप्पा मोरया' अशा जयघोषात लोकमत 'ती' चा गणपती उपक्रमाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या मिड नाईट रॅलीचा बी एम सीसी रोड वरील महावीर जैन हॉस्टेल येथे अत्यंत उत्साहात समारोप झाला. पुण्याच्या सहा विविध भागातून निघालेल्या या रॅलीमध्ये शेकडो महिला आणि तरुणी सहभागी झाल्या . यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यासह हजारो महिला आवर्जून उपस्थित होत्या.
'तिचे पुणे, सुरक्षित पुणे' याचा प्रत्यय महिलांच्या उपस्थितीतून आला. यावेळी सर्वानी २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ ते ८ या वेळेत सर्वत्र महिलांच्या हस्ते आरती करण्याची शपथ घेतली. लोकमतचे संपादक विजय बाविस्कर यांनी स्त्री सक्षमीकरणाचे महत्व अधोरेखित करत सर्वाना शुभेच्छा दिल्या.
रॅलीचे मार्ग...
रॅली क्रमांक १ - अप्पा बळवंत चौक- गुरुजी तालीम मंडळ -शगुन चौक, अलका थिएटर चौक- खंडुजीबाबा चौक- फर्ग्युसन कॉलेज रोड- महावीर जैन छात्रालय
रॅली क्रमांक २- येरवडा- गुंजन चौक- जहाँगीर हॉस्पिटल- आरटीओ- संचेती हॉस्पिटल- जंगली महाराज रस्ता- खंडुजीबाबा चौक- फर्ग्युसन कॉलेज रोड- महावीर जैन छात्रालय
रॅली क्रमांक ३ - हडपसर मेगा सेंटर- बिगबझार चौक- गोळीबार मैदान- स्वारगेट- टिळक रोड - खंडुजीबाबा चौक फर्ग्युसन कॉलेज रोड- महावीर जैन छात्रालय
रॅली क्रमांक ४ - अहिल्यादैवी चौक सातारा रोड- सिटी प्राईड चौक- लक्ष्मीनारायण थिएटर- गणेश कला, क्रीडा मंच- टिळक रोड- फर्ग्युसन कॉलेज रोड- महावीर जैन छात्रालय
रॅली क्रमांक ५ - वडगाव पूल-सिंहगड रस्ता- राजाराम पूल- मातोश्री वृद्धाश्रम-ताथवडे उद्यान-करिष्मा सोसायटी रोड-कर्वे रस्ता-एसएनडीटी महाविद्यालय-लॉ कॉलेज रस्ता-महावीर जैन छात्रालय
रॅली क्रमांक ६ - लोकमत पिंपरी कार्यालय- बोपोडी-वाकडेवाडी-संचेती हॉस्पिटल-जंगली महाराज रस्ता-गरवारे पूल-फर्ग्युसन कॉलेज रस्ता- महावीर जैन छात्रालय