शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा अन् विराट कोहलीच्या पगारात होणार मोठी घट; शुभमन गिलला मिळणार 'बंपर फायदा'?
2
सोशल मीडियावरचे आरोप गडकरींनी लोकसभेत फेटाळले; म्हणाले, इथेनॉल मिश्रित इंधनावर ARAI ने १ लाख किमी...
3
Western Overseas Study Abroad IPO: पहिल्याच दिवशी IPO नं दिला झटका, आपटून ५२ रुपयांवर आला; लागलं लोअर सर्किट
4
Travel : दुबई स्वप्ननगरी! किती खर्चात होईल ५ दिवसांची शाही सफर; वाचा संपूर्ण बजेट आणि जाणून घ्या व्हिसाबद्दल..
5
"मी सनातन धर्माचा…"; गीता पठणासंदर्भात हुमायूं कबीर यांचं वक्तव्य, केली मोठी घोषणा!
6
Relationship Tips: बायकोला खुश कसे ठेवावे? प्रेमानंद महाराज म्हणाले, 'मी यात तज्ज्ञ नाही पण...'
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! BoAt कंपनीच्या कारभारात गंभीर त्रुटी, नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघड
8
कोकणात मोठा प्रतिसाद, मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची करा; प्रवाशांची मागणी पूर्ण कधी होईल?
9
बांगलादेशात युनूस सरकार मावळणार, संध्याकाळी मोठी घोषणा होणार; संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं
10
पाकिस्तानचे पुन्हा तुकडे होणार? मंत्र्याच्या वक्तव्याने नवा वाद, तज्ञांनी व्यक्त केली चिंता...
11
"एक-दोन नाही, हजारो कपल्सच्या रोमान्सचे व्हिडीओ रेकॉर्ड"; आरोपीचा खळबळजनक खुलासा
12
महाराष्ट्रातील सीमेवरील गावात गुजरातची घुसखोरी; सीमांकन हळूहळू वाढवत असल्याचा स्थानिकांचा दावा
13
'त्यांचे हाथ थरथरत होते, दडपणाखाली होते'; राहुल गांधी अमित शाहांच्या लोकसभेतील भाषणावर आता काय बोलले?
14
लग्नाआधीच मुलगी गरोदर; आईला कळताच तिच्या प्रियकराला घरी बोलवलं अन् मग...शेवट भयंकर!
15
आम्हाला तर पाकिस्तान सोबत येणे शक्य, पण हे दोन देश...; नव्या समूहासंदर्भात काय म्हणाला बांगलादेश
16
'स्वाभिमानाने जगणारा कोकणातला शेतकरी आज चिंतेत', वलसाड हापूसवरून भास्कर जाधव आक्रमक
17
व्हॉट्सअ‍ॅपवरची एक चूक थेट घेऊन जाऊ शकते तुरुंगात! 'ही' गोष्ट करताना किमान दहा वेळ विचार कराच
18
पाकिस्तानमध्ये कधी येणार? 'रेड सी फिल्म फेस्टिव्हल'मध्ये आलिया भटला चाहत्याचा प्रश्न; म्हणाली...
19
ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने सोडलं मौन, म्हणाला- "माझ्या पत्नीला..."
20
धक्कादायक! दारुच्या नशेत होता बोगस डॉक्टर; YouTube पाहून ऑपरेशन, चुकीची नस कापली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड’च्या प्रवेशिकांची तज्ज्ञांकडून छाननी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 01:46 IST

गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड’च्या दुसऱ्या पर्वाला जिल्ह्यातून उदंड प्रतिसाद मिळाला आहे.

पुणे : गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड’च्या दुसऱ्या पर्वाला जिल्ह्यातून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. १३ क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींनी पुरस्कारासाठी याही वर्षी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव दाखल केले आहे. तज्ज्ञ परीक्षकांकडून या प्रस्तावांची तपासणी सुरूअसून, येत्या सोमवारी (दि.११) विजेत्या स्पर्धकांची नावे घोषित करण्यात येणार आहेत. गावखेड्याच्या बदलाची नोंद घेण्यासाठी गावच्या कारभाऱ्यांना ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड’ हा बीकेटी टायर्स प्रस्तुत व पतंजली आयुर्वेद प्रायोजित ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड्स’ने गौरविण्याचा निर्णय ‘लोकमत’ने गेल्या वर्षी घेतला. गावाच्या विकासासाठी झटणाºया सरपंचांना वैयक्तिक पातळीवर गौरविणारा हा पहिलाच पुरस्कार आहे. याही वर्षी सरपंचांनी विविध १३ क्षेत्रांत केलेल्या कामांची पाहणी करून या प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया ग्रामपंचायती आणि सरपंचाची निवड करण्यात येणार आहे. ‘लोकमत’च्या या उपक्रमाला याही वर्षी विविध गावच्या सरपंचांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रस्ताव पाठवले.या सर्व प्रस्तावांची तज्ज्ञ परीक्षकांकडून छाननी करण्यात आली आहे. नॅशनल फेडरेशन फॉर अर्बन बँक्स अँड के्रडिट सोसायटीचे उपाध्यक्ष विद्याधर अनास्कर आणि राज्याचे माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट या तज्ज्ञांनी सर्व अर्जाची बारकाईने पाहणी केली. काही सरपंचाशी थेट संपर्क साधून त्यांनी प्रश्नही विचारले.याद्वारे त्यांनी १३ क्षेत्रांतून विविध सरपंचाची या पुरस्कारासाठी निवड केली असून, येत्या सोमवारी (दि. ११)येरवडा येथील गुंजन टॉकीजशेजारी असणाºया अण्णा भाऊ साठेया सभागृहात होणाºयाकार्यक्रमात भाग्यवान विजेत्यांची नावे मान्यवरांच्या हस्ते जाहीर करण्यात येणार आहेत.पुरस्काराच्या कॅटेगरी आणि निकषजल व्यवस्थापन, वीज व्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरणसंवर्धन, प्रशासन /ई-प्रशासन/ लोकसहभाग, रोजगारनिर्मिती, कृषी तंत्रज्ञान, उदयोन्मुख नेतृत्व, सरपंच आॅफ द इयर या १३ क्षेत्रांत हे पुरस्कार दिले जाणार आहेत. या प्रत्येक क्षेत्रात सरपंचांनी केलेले काम पाहून त्या-त्या क्षेत्रातील विजेते निवडले जाणार आहेत.>पुरस्कार प्रदान सोहळासोमवार दि. ११ मार्च २0१९ रोजी सायंकाळी ४ वाजता लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, येरवडा, गुंजन थिएटरजवळ होणार आहे. अधिक माहितीसाठी गणेश गंगाळे यांच्याशी सकाळी १० ते सायंकाळी ६.३० पर्यंत संपर्क साधावा. ८८८८७५८६७६>गावांमधील कृषी, जल, स्वच्छता, आरोग्य या क्षेत्रांत काम करणे आव्हानात्मक असते. म्हणूनच त्याची दखल घेऊन आदर्श सरपंचांना गौरविणे हे महत्त्वाचे आहे.- उमाकांत दांगट,माजी कृषी आयुक्त

टॅग्स :Lokmat Sarpanch Awardsलोकमत सरपंच अवॉर्डस्