शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

पुणेकरांनो टाका पाट्या ; अन् पाठवा आमच्याकडे  : ‘लोकमत’तर्फे शनिवारपासून प्रदर्शन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 16:07 IST

तुमच्या खास पुणेरी शैलीत, कानपिचक्या घेणारी, खुमासदार मार्मिक टिपण्णी (की टोमणा?) करणारी हटके पाटी लिहून आमच्याकडे puneripatya2018@gmail.com या पत्त्यावर पाठवा.

ठळक मुद्देपुणेरी पाट्या; आरसा अभिमानाचा अन् स्पष्टवक्तेपणाचा! हटके पाटी लिहून puneripatya2018@gmail.com पाठवा या पत्त्यावर पाठवा

पुणे : आम्ही खाण्याचे पैसे घेतो, अन्न पानामध्ये टाकण्याचे नाही’,‘एक ते चार या वेळेत कोणीही प्रचारासाठी येऊ नये’, ‘चार वेळा कंट्रोल एस दाबले तरी सेव्ह एकदाच होते’, ‘आमची कोठेही शाखा नाही’, ‘आमच्या घरातील मुले क्रांतिकारक आहेत, त्यामुळे तुमच्या गाडीवर हल्ला झाल्यास आम्ही जबाबदार असणार नाही’,‘आमचं कुत्र ९९ जणांना चावलंय, तुम्ही बेसावध राहिलात तर त्याची सेंच्युरी पूर्ण होईल’ अशा पाट्या दृष्टीस पडू लागल्या की तुम्ही नक्की पुण्यातच आहात हे सुज्ञास सांगणे न लगे! 

             पुणेरी पाट्या म्हणजे आमच्या अभिमानाच आरसाच जणू! होय, पाट्यांमधून झळकतो पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा, थेट भिडण्याची वृत्ती. पुण्याच्या या अभिमानाचे साक्षदार होण्यासाठी ‘लोकमत’च्या  वतीने पृथ्वी एडिफाईस प्रस्तुत रुद्रा लेझर होमिओपॅथी क्लिनिक यांच्या सहयोगाने शनिवार आणि रविवारी ‘पुणेरी पाट्या प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. ‘खत्री बंधू पॉटआईस्क्रिम व मस्तानी’ सहप्रायोजक आहेत. पुणेकर पाट्यांमधून स्वत:च्या व्यंगावर बोट ठेवण्याचं धाडस दाखवतो, चपखल शब्दांमधून मार्मिक टिपण्णीही झळकते याच पाट्यांमधून..! 

           पुणेकर जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी आपली स्वत:ची ओळख निर्माण करतात. अभिमान आहे मला आणि तुम्हाला पुणेरी असल्याचा! हाच अभिमान आता झळाळून निघणार आहे एका अभिनव स्पर्धेतून! तुमच्या खास पुणेरी शैलीत, कानपिचक्या घेणारी, खुमासदार मार्मिक टिपण्णी (की टोमणा?) करणारी हटके पाटी लिहून आमच्याकडे puneripatya2018@gmail.com या पत्त्यावर पाठवाव्यात. खासमखास पुणेरी पाट्यांना  'आकर्षक बक्षीसासाह लोकमत’मधून यथायोग्य प्रसिध्दी दिली जाईल. 

              याला वयाचे बंधन नाही, शिक्षणाची अट नाही आणि जातपंथवर्णभेद तर मुळीच नाही. अगदी लहान वयाचा एखादा मुलगाही मार्मिक शब्दात भला मोठा आशय व्यक्त करतो व एखादे वयस्कर आजोबाही या रस्त्यावरचा सिग्नल विमानालाही उपयोगी पडतो असे म्हणू शकतात. पुणेरी काकू एखाद्याची अशी खिल्ली उडवतील की हास्याचे फवारे उडतील व आजीही नव्या पोरींची अशी फिरकी घेतील की त्या लाजून चूर होतील. चेष्टा करावी तर त्यातही काही टँलेट असावे ही दृष्टी पुणेरी पाट्यांनीच दिली. खडूस, खत्रूड, खवटच व तरीही हवेहवेसे वाटणारे या पाट्यांमधील शब्द अस्सल पुणेकराची तैलबुद्धी दाखवतात व त्याचा खास पुणेरी बाणाही!इथला रिक्षावालाही रिक्षाच्या मागे चिकटू नका, मार बसेल असे लिहून जातो. तर एखादा मालमोटार चालक तेरा मेरा साथ असे १३, मध्ये मेरा व नंतर ७ असे अंकात लिहून मजा आणतो. कुत्र्यापासून सावध रहा ऐवजी, सावधान, कुत्रा चावरा आहे असेही इथेच लिहितात.  बेल एकदाच वाजवावी, जिना चढताना आवाज करू नये, दरवाजासमोर वाहने लावल्यास पंक्चर केली जातील अशा मजेशीर रचना म्हणजे मधूनच बरसणारी आनंदाची सरच असते. पुण्याशिवाय अन्यत्र कुठे हा अनुभव येणार नाही. 

टॅग्स :PuneपुणेLokmatलोकमतLokmat Eventलोकमत इव्हेंट