लोकमत 'लोक'जीबी विशेष: शहरातील सर्व प्रश्न मिळून सोडवूयात, अतिरिक्त आयुक्तांच्या भावना
By प्रमोद सरवळे | Updated: March 5, 2024 15:00 IST2024-03-05T14:59:48+5:302024-03-05T15:00:00+5:30
शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महत्वाच्या रस्त्यावर काम करणे सुरू आहे

लोकमत 'लोक'जीबी विशेष: शहरातील सर्व प्रश्न मिळून सोडवूयात, अतिरिक्त आयुक्तांच्या भावना
पुणे : सर्व माजी नगरसेवक जनतेच्या अडचणी आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आजच्या जीबीत या सर्व माजी नगरसेवकांनी मांडलेल्या प्रश्नांची नोंद घेण्यात आली आहे. आज आपल्यासमोर असणारे प्रश्न आपण मिळून सोडवले पाहिजे त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, अशा भावना पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी व्यक्त केल्या. लोकमतने आयोजित केलेल्या लोकजीबीमध्ये ते बोलत होते.
पुढे बोलताना ढाकणे म्हणाले, येणाऱ्या काळात अजून अडचणी वाढू शकतात. त्यासाठी आपण एकत्र राहिले पाहिजे. शहरातील विकासकामे करताना आपली सर्वांची मते घेण्यात येणार आहे. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महत्वाच्या रस्त्यावर काम करणे सुरू आहे. मिशन 15 नुसार, शहरातील मुख्य रस्त्यांचे कामे केली जाणार आहेत.
शहरातील दीडशे मिसिंग लिंक काढण्यात आल्या आहेत. त्याच्यावर काम सुरू आहेत. ट्राफिक संदर्भात 40 ठिकाणे शोधण्यात आली आहेत, त्यावर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात पोलीस आणि पालिका प्रशासन एकत्र काम करत आहेत, असं ढाकणे म्हणाले.