पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाचे मैदान दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना चित्रपटाच्या शूटिंगसाठी भाड्याने दिल्याप्रकरणी सिनेटमध्ये शनिवारी सदस्यांनी तीव्र भावना केल्या. त्यांच्या भावनांचा आदर राखत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी याप्रकरणी सिनेटमध्ये दिलगिरी व्यक्त केली. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मैदान भाड्याने दिल्याने विद्यापीठाचे १४ कोटी ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे 'लोकमत'ने उजेडात आणले. या वृत्ताची दखल घेऊन सिनेटमध्ये संतोष ढोरे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला.सिनेट सदस्यांनी यावर तीव्र भावना व्यक्त केल्या. चित्रपटाला अशाप्रकारे मैदान भाड्याने देणे चुकीचे आहे, कोणतेही भाडे न घेता मैदान भाड्याने घेणे गंभीर असल्याच्या भावना सदस्यांनी व्यक्त केल्या.राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी ७ दिवसात चित्रपटाचा सेट काढून घेण्याचे आदेश देऊनही ८ महिने सेट काढला नाही. एकंदरीत या प्रकरणात विद्यापीठाची नाचक्की झाली आहे.
लोकमत इम्पॅक्ट: चित्रपटाच्या सेटप्रकरणी सिनेटमध्ये कुलगुरूंची दिलगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 16:39 IST
चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी विद्यापीठाकडून मैदान भाड्याने दिल्यामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा लोकमतकडून उजेडात आणण्यात आला होता.
लोकमत इम्पॅक्ट: चित्रपटाच्या सेटप्रकरणी सिनेटमध्ये कुलगुरूंची दिलगिरी
ठळक मुद्देलोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन मांडला स्थगन प्रस्तावराज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी ७ दिवसात चित्रपटाचा सेट काढून घेण्याचे आदेशही डावलला