लोकमत न्यूज नेटवर्क पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड मधील ठराविक कामगारांना पात्रता नसताना पदोन्नती दिली आहे. १०० रिक्त जागांवर ज्युनियर क्लर्क पदासाठी खात्याअंतर्गत जाहिरात दिली असताना २०० ज्युनियर क्लार्कची प्रमोशन ऑर्डर काढल्याबाबतच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे पीएमपीएमएलची प्रतिमा जनमानसात मलीन झाली आहे. त्यामुळे या पदोन्नतीची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीला १५ दिवसांत अहवाल द्यावा लागणार आहे.
‘लोकमत’ने पीमएपीएमएलचा घोटाळा या नावाने वृत्त मालिका केली होती. त्याची दखल पीएमपीएमएल प्रशासनाने घेतली आहे. पीएमपीएमएलमधील १३ निलंबित कर्मचाऱ्यांना कुठलीही कार्यपद्धती न अवलंबता मागील व्यवस्थापकीय संचालकाने कामावर रुजू केले होते. १९८ कंडक्टर आणि इतर श्रेणीतील कर्मचाऱ्यांना क्लार्कचे प्रमोशन दिले गेले. एकाला पहिल्यांदा क्लासचे प्रमोशन आणि नंतर जनसंपर्क अधिकारी केले. काहीं कामगारांना पात्रतेचे निकष डावलत कनिष्ठ पदावरून वरिष्ठ पदावर बढती दिली आहे. त्यामुळे या पदोन्नतीला स्थगिती द्यावी, अशी मागणी पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी केली आहे.
शिंदेसेनेच्या शहरप्रमुखांनी केली होती तक्रार...
- पीएमपीएमएलमधील पदोन्नतीमध्ये सेवा ज्येष्ठता, पात्रता आणि शासनमान्य निकषांचा भंग झाल्याची तक्रार शिंदेसेनेचे शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी केली होती. या तक्रारीवर पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज बी. पी. यांनी चौकशी समिती नेमण्याचे आदेश काढले आहेत.
- या चौकशी समितीचे अध्यक्ष पीएमपीएमएलचे सहव्यवस्थापकीय संचालक ऑलिस पोरे आहेत. या समितीचे सदस्य पुणे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विजय थोरात, पीएमपीएमएलचे मुख्य अंतर्गत लेखापरीक्षक सरेश खेडकर यांचा समावेश आहे. या समितीने सर्व तक्रारींची चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल पंधरा दिवसांच्या आत द्यावा, असे आदेशात नमूद केले आहे.
- ज्यांना क्लार्क म्हणून बढती दिली त्यामध्ये कायम कंडक्टर, कायम क्लिनर, शिपाई, झाडूवाला, ड्रायव्हर यांचा समावेश आहे. कॉम्प्युटर प्रोग्रामर या जागेवर कंडक्टर प्रवर्गातील अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे.
Web Summary : Following Lokmat's report, PMPML initiates probe into promotion irregularities. A three-member committee will investigate alleged violations of norms in promotions of conductors, cleaners, and drivers to clerical posts. Report due in 15 days.
Web Summary : लोकमत की रिपोर्ट के बाद, पीएमपीएमएल ने पदोन्नति अनियमितताओं की जांच शुरू की। एक तीन सदस्यीय समिति कंडक्टरों, क्लीनर और ड्राइवरों को लिपिक पदों पर पदोन्नति में कथित उल्लंघनों की जांच करेगी। 15 दिनों में रिपोर्ट अपेक्षित है।