'Lokmat' honors journalists in Pune in a ceremonial ceremony | दिमाखदार सोहळ्यात पुण्यातील पत्रकारांचा ‘लोकमत’ने केला गौरव

दिमाखदार सोहळ्यात पुण्यातील पत्रकारांचा ‘लोकमत’ने केला गौरव

पुणे : समाजहितैषी भूमिकेला बळ देणारी पत्रकारिता सुदृढ व्हावी ही भूमिका असणाऱ्या ‘लोकमत’तर्फे पुण्यातील सर्व माध्यमांतील पत्रकारांसाठी स्पर्धा घेतली. उत्कृष्ठ पत्रकारांचा बुधवारी दिमाखदार सोहळ्यात गौरव करण्यात आला.

दैनिक ‘सामना’चे संपादक खासदार संजय राऊत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लोकमत संपादकीय मंडळाचे अध्यक्ष विजय दर्डा अध्यक्षस्थानी होते. पुण्याचे प्रथम नागरिक महापौर मुरलीधर मोहोळ, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, खासदार वंदना चव्हाण, अमर साबळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, चाणक्य मंडलचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी, ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, लोकमत (पुणे)चे संपादक प्रशांत दीक्षित या वेळी उपस्थित होते.

‘लोकमत’च्या पत्रकारितेतील दिलदारीचा गौरव करत राऊत म्हणाले की, एक वृत्तपत्र दुसºया वृत्तपत्राच्या संपादकाला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावते. हा मनाचा मोठेपणा, ही पत्रकारितेतील दिलदारी आहे. सर्व क्षेत्रांतील, सर्व वृत्तपत्रांतील पत्रकारांना पुरस्कार दिले. ‘सकाळ’चे सर्वांत ज्येष्ठ संपादक असलेले एस. के. कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. मी नेहमी नंबर वनचे आकडे पाहतो. लोकमतचे वाचक दोन कोटींपर्यंत पोहोचले आहेत. देशातील क्रमांक एकचे हे दैनिक बनले आहे. महाराष्ट्राच्या मातीतले मराठी दैैनिक देशात अव्वल आहे, याचा मला अभिमान आहे. स्पर्धा असावीच; पण मनाचा मोठेपणा असावा.

विजय दर्डा म्हणाले, ‘‘माझे वडील जवाहरलालजी दर्डा यांनी शिकवण दिली, की पत्रकारिता करायची असेल तर हिंमत असली पाहिजे. स्वत:वर, कामावर विश्वास हवा. काम करीत असताना कोणतीही किंमत मोजण्याची तयारी हवी. संकुचित विचार ‘लोकमत’ला मान्य नाहीत. तळागाळातील लोकांसाठी काम करण्याची ‘लोकमत’ची भूमिका आहे. असे काम करणाऱ्यांचा गौरव व्हावा, नव्याने येणाºयांना उत्तेजन मिळावे, म्हणून पुरस्काराची योजना आहे. त्याची सुरूवात ‘लोकमत’ने केली आहे. समाजाची सेवा करण्यासाठी वृत्तपत्र असते. त्यांच्यात स्पर्धा असावी परंतु, अनास्था नसावी. पत्रकारितेतील उत्कृष्टतेला दाद देण्यासाठीच लोकमत पत्रकारिता पुरस्काराचे आयोजन केले आहे. हा ‘लोकमत’चा नव्हे, तर पत्रकारितेचा उत्सव आहे. पत्रकार, पत्रकारिताच या उत्सवातील मानकरी आहेत.’

‘लोकमत’ पुणेचे संपादक प्रशांत दीक्षित यांनी प्रास्ताविकात स्थानिक पत्रकारितेचे महत्त्व सांगितले. शहर व जिल्हा स्तरावर काम करणाºया पत्रकारांच्या कामाचा सन्मान होण्याची गरज होती. या सुरुवातीसाठी पुणे हे उत्तम शहर आहे. पुण्यात होते ते राज्यात होते व नंतर देशातही होते. एस. के. कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. ५१ हजार रुपये रोख आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कुलकर्णी यांनी या रकमेत आपली काही भर घालून अक्कलकोट येथील शाळेच्या प्रयोगशाळेसाठी देणगी दिली.
लोकमत जीवनगौरव पुरस्कार, चंदन हायगुंडे (इंडियन एक्स्प्रेस)-

शोध पत्रकारिता, धर्मेंद्र कोरे (महाराष्टÑ टाइम्स)- पर्यावरण, सुनील राऊत (प्रभात) - नागरी प्रश्न, राहुल देशमुख, आकाश गुलणकर (पुणे मिरर)- आॅन द स्पॉट रिपोर्टिंग, सुप्रिया देडगावकर (पुणे मिरर)- वुमेन सेंटरिक स्टोरी, मंगेश पवार (पुण्यनगरी) - फोटोग्राफर, गोविंद वाकडे (न्यूज १८ लोकमत)- एक्सक्लुझिव्ह स्टोरी, हलिमाबी कुरेशी (बीबीसी मराठी)- इलेक्ट्रॉनिक मीडिया (ह्युमन इंटरेस्ट स्टोरी), राहुल गायकवाड (लोकमत)- इलेक्ट्रॉनिक मीडिया (ह्युमन इंटरेस्ट स्टोरी. )
शहर आणि जिल्ह्यात वार्तांकन करणाºया पत्रकारांकडून प्रवेशिका मागविल्या होत्या. स्वतंत्र ज्युरी मंडळाने ८० प्रवेशिकांमधून ही निवड केली. २५ हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

अजित पवार यांना ‘स्टेपनी’ म्हटल्याने नाराजी
खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांचा उल्लेख ‘स्टेपनी’ असा केल्याने राष्टÑवादी काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर आहे. अजित पवार यांच्या बंडखोरीबाबत ते म्हणाले, ‘‘आमच्या गाडीचा एखादा तरी नटबोल्ट ते पळवणार याची खात्री होती, मात्र त्यांनी स्टेपनीच पळवली.’’ त्यानंतरचे सगळे प्रश्न स्टेपनीभोवतीच फिरले. अजित पवार स्टेपनी आहेत का? या प्रश्नावर सावरत ते म्हणाले, ‘‘ गाडीचा स्टेपनी हासुद्धा महत्त्वाचा भाग आहे. स्टेपनीशिवाय गाडी लांबचा प्रवास करू शकत नाही. अजित पवार अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्याशिवाय सरकार चालूच शकत नाही. त्यांनी आमचे साहित्य चोरण्याचा प्रयत्न केला. अजित पवार स्टेपनी नव्हे, चाक आहेत. आता ते गाडीलाही लागले आहे.’

Web Title: 'Lokmat' honors journalists in Pune in a ceremonial ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.