बंद घराचे दार फोडून दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:45 IST2019-01-10T00:45:09+5:302019-01-10T00:45:23+5:30

मंचरमधील घटना : कडीकोयंडा कटरने तोडला

Locked off the door of the house | बंद घराचे दार फोडून दागिने लंपास

बंद घराचे दार फोडून दागिने लंपास

मंचर : लग्न समारंभासाठी बाहेरगावी गेल्याने बंद घराचे दार तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने नेले. ही घटना मंचर शहरातील वृंदावन सोसायटी येथे मंगळवारी भरदुपारी घडली. शरदराव बबनराव शिंदे यांनी मंचर पोलिसांत तक्रार दिली आहे. शिंदे हे कुटुंबीयांसह मंचर शहरातील चांडोली रस्त्यावर असलेल्या वृंदावन हौस्ािंग सोसायटीत राहतात. आळंदी येथे लग्न समारंभ असल्याने मंगळवारी श्ािंदे कुटुंबीयांसह लग्नाला गेले होते. दुपारी १२ ते ४ या दरम्यान अज्ञात चोरट्याने शिंदे यांच्या घराचा कडीकोयंडा कटरने तोडला.

आजूबाजूच्या सदनिका नेहमीच बंद असल्याने चोरट्यांनी सराईतपणे हे काम केले. घरात प्रवेश करून आतील बेडमध्ये असलेले कपाट तोडले. त्यातील कपडे अस्ताव्यस्त करून शालू, कुर्ता, समई, मनघटी घड्याळ, लहान मुलाचे मनघटी, चांदीचे पैंजण, सोन्याची कानातील रिंग या वस्तू या चोरट्यांनी चोरुन नेल्या. हा चोरीचा प्रकार भरदिवसा घडल्याने खळबळ उडाली आहे. श्ािंदे लग्न समारंभावरुन घरी परत आल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. शरदराव बबनराव शिंदे यांनी या संदर्भात मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चोरट्यांनी बंद सदनिकांवर लक्ष केंद्रित केल्याने नागरिकांनी बंद सदनिकेत ऐवज ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
 

Web Title: Locked off the door of the house

टॅग्स :Puneपुणे