शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
4
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
5
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
6
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
7
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
9
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
10
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
11
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
12
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
13
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
14
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
15
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
16
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
17
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
18
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
20
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?

लॉकडाऊनचा दक्षिण पुण्याला असाही फटका; 'स्वयंचलित पर्जन्य मापक केंद्रां'ची उभारणी रेंगाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 11:52 IST

२५ सप्टेंबर २०१९ च्या 'काळरात्री' कात्रज परिसरात थोड्या वेळात प्रचंड पाऊस झाला़. कात्रजपासून सिंहगडपर्यंतच्या परिसरात महापूर आला होता. त्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले़ तर मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले.  

ठळक मुद्देपुणे शहरात १० ठिकाणी स्वयंचलित पर्जन्य मापन केंद्र उभारण्यात येणार आहे.

विवेक भुसे-पुणे : २५ सप्टेंबर २०१९ हा दिवस दक्षिण पुण्यासाठी एक काळा दिवस ठरला होता. त्याच्या खुणा अजूनही या परिसरात दिसत असतानाच पुन्हा पावसाळा आला असताना एक चिंताजनक बातमी पुढे आली आहे. कात्रज ते सिंहगड रोड परिसरात उभारण्यात येणाऱ्या स्वयंचलित पर्जन्य मापक केंद्रांच्या उभारणीला लॉकडाऊनचा फटका बसला आहे. 

लॉकडाऊनमुळे स्वयंचलित पर्जन्य मापक केंद्राच्या उभारणीचे काम होऊ शकले नाही. आता काम सुरु करण्यात आले असले तरी या पावसाळ्यात ते पूर्ण होईल का याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. २५ सप्टेंबर २०१९ च्या काळ रात्री कात्रज परिसरात थोड्या वेळात प्रचंड पाऊस झाला़. कात्रजपासून सिंहगडपर्यंतच्या परिसरात महापूर आला होता. त्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले़ तर मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. त्याचवेळी शहराच्या इतर भागातील पावसाचे प्रमाण कमी होते.  या परिसरात पर्जन्यमापक केंद्र नसल्याने नेमका किती पाऊस पडला, याची कोणतीही अधिकृत मोजणी केले गेली नाही. त्यामुळे या भागात स्वयंचलिक पर्जन्यमापक केंद्र उभारण्याची मागणी केली गेली. हवामान विभागानेही त्यादृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली. शहराच्या वेगवेगळ्या भागात १० स्वयंचलित पर्जन्यमापक केंद्र उभारण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला. त्याला केंद्र सरकारने मान्यताही दिली. मात्र, त्याचवेळी लॉकडाऊन सुरु झाले व हे केंद्र उभारणीचे काम ठप्प झाले.

याबाबत हवामान विभागातील उपकरण विभागाचे शास्त्रज्ञ के़. एन. मोहन यांनी सांगितले की, पुणे शहरातील १० ठिकाणे निवडण्यात आली आहेत. त्यापैकी काही जागेवर परवानगीही मिळाली आहे. काहींची परवानगी मिळणे अजून बाकी आहे. लॉकडाऊनमुळे परवानगी मिळालेल्या ठिकाणी स्वयंचलिक पर्जन्य मापन केंद्र उभारणीचे काम खोळंबले आहे. आता लवकरात लवकर ते काम पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.

पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी याबाबत सांगितले की, पुणे शहरात १० ठिकाणी स्वयंचलित पर्जन्य मापन केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यापैकी शिवाजीनगर, लोहगाव आणि पाषाण या तीन ठिकाणी जानेवारीपर्यंत स्वयंचलित पर्जन्य मापक केंद्र उभारण्यात आली आहे. त्यावरुन त्या भागातील पावसाचा अंदाज देण्यास सुरुवात करण्यात येत आहे. मार्चमध्ये आणखी ४ ठिकाणी या केंद्राचे काम सुरु होणार होते. मात्र, लॉकडाऊनमुळे हे काम ठप्प झाले़ आता लॉकडाऊनमध्येही काम सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे या पावसाळ्यात हे काम पूर्ण करुन ही केंद्रे कशी सुरु करता येईल, याचा आमचा प्रयत्न आहे............देशभरातील तालुका पातळीवर तसेच गावागावातील पावसाची अचूक नोंदणी व्हावी, यासाठी केंद्र सरकारने देशभरात १३५० स्वयंचलित पर्जन्य मापक केंद्रे उभारणीचा मोठा कार्यक्रम आखला होता. मात्र, एका तपानंतरही त्यापैकी केवळ ३२३ केंद्रे आतापर्यंत उभारणी केली गेली आहे. त्यापैकी ६६ केंद्रे महाराष्ट्रात आहेत.

टॅग्स :PuneपुणेweatherहवामानRainपाऊस