शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

‘टॉयलेट’ रद्द करण्यासाठी महापालिकेतच कार्यरत आहे ‘लॉबी’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 8:51 PM

राजकारण आणि आर्थिक कारणामुळे स्वच्छतागृहाचे काम पूर्ण झाले नसल्याच्या कथांना उधाण आले आहे....

ठळक मुद्देप्रस्तावित स्वच्छतागृहाचे प्रत्यक्षात कामच नाही होत स्वच्छतागृहाच्या चोरीची पोलिस चोकीत तक्रार

- माऊली शिंदे -  

कल्याणीनगर : एखाद्या व्यावसायिकाच्या जागेसमोर स्वच्छतागृह तयार करण्याचा प्रस्ताव दाखल करायचा. ह्या प्रस्तावाचे पत्र व्यावसायिकाला द्यायची. त्यानंतर आर्थिक साटेलोटे करायचे. आणि यातून तो स्वच्छतागृह होऊ द्यायचे नाही. हा स्वच्छतागृहाचा पॅटर्न सध्या जोरात असल्याची माहिती एका राजकीय प्रतिनिधींनी दिला. यामुळे स्वच्छतागृहाचे चोरी प्रमाण वाढत आहे. दोन वर्षांपूर्वी विमाननगर आणि कोरेगावपार्कमध्ये अशी प्रकारच्या स्वच्छतागृहाच्या चोऱ्या झाल्या आहेत.    नगररोड वडगावशेरी क्षैत्रिय कार्यालयाने काही महिन्यापुर्वी विमानगर येथील गिगास्पेस जवळ एका स्वच्छतागृहाचे काम सुरू केले होते. पण अचानक या स्वच्छतागृहाचे काम बंद करण्यात आले. राजकारण आणि आर्थिक कारणामुळे स्वच्छतागृहाचे काम पूर्ण झाले नसल्याच्या कथांना उधाण आले आहे. दरम्यान, दोन वर्षापूर्वी विमाननगर येथील एक स्वच्छतागृह रात्रोरात्र चोरीला गेले होते. अशा प्रस्तावित पण न झालेल्या टॉयलेट (स्वच्छतागृहा)च्या कथांची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.नगररोड वडगावशेरी क्षेत्रिय कार्यालयांतर्गंत येणाऱ्या वडगावशेरी, चंदननगर, खराडी, विमाननगर, कल्याणीनगर, गांधीनगर या भागाची लोकसंख्या तीन लाखांपेक्षा जास्त आहे. मात्र,या परिसरातील स्वच्छतागृहाची संख्या फक्त सात आहे. नागरिकांच्या सोयीसाठी अनेकदा स्वच्छतागृहाच तयार करण्याची प्रस्ताव दिले जातात. स्वच्छतागृहांसाठी निधी दिला जातो. मात्र, प्रत्यक्षात स्वच्छतागृह तयार होत नाही. 

* स्वच्छतागृह गेले चोरीला विमानगर परिसरामध्ये अनेक आयटी पार्क आणि हॉटेल्स आहेत. मात्र, या परिसरामध्ये एकच स्वच्छतागृह आहे. या भागामध्ये स्वच्छतागृह करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी देण्यात आले होते. या प्रस्तावानुसार आयबीएस हॉटले काश्मीर सोप या रस्त्यावर स्वच्छतागृहाचे काम सुरू केले होते. या स्वच्छतागृहाला काही व्यवसायिकांनी विरोध केला होता. मात्र, त्यांनतरही स्वच्छतागृहाचे काम पुर्ण केले होते. मात्र, अचानक एका रात्रीमध्ये स्वच्छतागृह चौरीला गेले. या स्वच्छतागृहाच्या चोरीची तक्रार पोलिस चोकीत करण्यात आली होती. मात्र, तक्रारीनंतर ही पुढील तपास झाला नाही..

* एका फोनमध्ये काम पाडले बंदयाच प्रमाणे विमाननगर गिगास्पेस जवळ स्वच्छतागृह बांधण्यासाठी निधी देण्यात आला होता. या स्वच्छतागृहाचे काम अर्धवट झाले होती. मात्र, स्वच्छतागृहामुळे व्यवसायाला डाग लागले. यामुळे एका व्यवसायिकांनी फोन फिरवला. स्वच्छतागृहाचे काम बंद पडले. त्यांनतर राजकीय दबावात तसेच अर्थकारणामुळे स्वच्छतागृहाचे काम सुरूच झाले नसल्याच्या कथा विमाननगर मध्ये चर्चिल्या जाऊ लागल्या आहेत.स्वच्छतागृहाची गरज असताना. पालिकेच्या जागेतील स्वच्छतागृहाचे काम कसे बंद पडते. स्वच्छतागृहाबाबत क्षैत्रिय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी ठाम भुमिका घ्यावी अशी मागणी नागरीक करू लागले आहे. .............................चोरीच्या स्वच्छतागृहाबाबत काहीच माहित नाही. गिगास्पेस जवळ पेट्रोलपंप बनणार आहे. त्यामुळे तेथील काम बंद केले असल्याचे समजत आहे. मात्र,याबाबत अधिक माहिती घेऊन सांगतो. सोपान पगार, उपअभिंयता, नगररोड क्षेत्रिय कार्यालय. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका