शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! तुकाईनगर येथे सार्वजनिक स्वच्छतागृहात आढळले पुरुष जातीचे जिवंत अर्भक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 17:20 IST

पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील तुकाईनगर भागात असणाऱ्या सार्वजनिक स्वच्छतागृहात सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पुरुष जातीचे जिवंत नवजात अर्भक सापडले आहे

धायरी : पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील तुकाईनगर भागात असणाऱ्या सार्वजनिक स्वच्छतागृहात सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पुरुष जातीचे जिवंत नवजात अर्भक सापडले आहे. याबाबत सिंहगड रस्ता पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. मिळालेली माहिती अशी की, वडगांव बुद्रुक परिसरातील तुकाईनगर भागात एक जोडपे गेल्या चार - पाच वर्षापासून राहत आहे. संबंधित महिला ही गर्भवती होती. मात्र गर्भवती असल्याचे शेजारील लोकांना समजू नये यासाठी ती महिला घराबाहेर पडत नव्हती. बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती स्वच्छ्तागृहात गेला असता त्यांना तिथे लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला. त्यांनी नीट निरखून पाहिले असता तिथे असलेल्या स्वच्छ्तागृहाच्या भांड्यामधे पुरुष जातीचे जिवंत अर्भक दिसून आले. याबाबत पोलिसांना तातडीने कळविण्यात आल्यानंतर त्या अर्भकाला तेथून हलवून ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबत एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून मी प्रातःविधी साठी गेले होते. मला काही समजले नाही असे म्हणत त्या महिलेने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असला तरी ती महिला खोटं बोलत असल्याचे पोलिसांच्या तपासणीत उघड झाले आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. 

निर्दयी महिलेबाबत नागरिकांत संताप...

घडलेल्या प्रकारावेळी तेथे जमलेल्या काही नागरिकांनी त्या अर्भकाचे व्हिडीओ काढले. काही क्षणातच ते व्हिडिओ व्हायरल झाले असून अशा निर्दयी महिलेला कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :PuneपुणेSocialसामाजिकPoliceपोलिसSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीस